पान एक-तिलारी दरीत क्रेन कोसळून एक ठार

पान एक-तिलारी दरीत क्रेन कोसळून एक ठार

88868
तिलारी घाट ः येथे रविवारी दरीत कोसळलेली क्रेन.
(छायाचित्र ः संदेश देसाई)

तिलारी दरीत क्रेन कोसळून एक ठार
---
चालक बचावला; अपघातग्रस्त वाहने बाहेर काढण्याआधीच दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ ः तिलारी घाटातील दरीत कोसळून अपघातग्रस्त झालेल्या दोन वाहनांना बाहेर काढण्यासाठी आलेल्या क्रेनला त्याच वळणावर अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रेन थेट दरीत कोसळली. आतील दोघांपैकी एकाने बाहेर उडी घेतली. मात्र, क्रेनच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझादनगर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. चालक अर्शफ कयामत अन्सारी (मूळ रा. मलहाना, बनकट्टा, उत्तर प्रदेश) किरकोळ जखमी झाला. ही दुर्घटना काल (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
बेळगावहून गोव्याला माल वाहतूक करणारी पिकअप व पुण्याहून गोव्याकडे येत असलेल्या पर्यटकांची मोटार काल तिलारी घाट उतरून गोव्याच्या दिशेने येत होती. जयकर पॉइंट येथील अवघड वळणावर चालकांचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहने कठडा तोडून सुमारे १५० फूट दरीत कोसळली. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी काल बेळगाव येथील वाजीद अत्तार यांची क्रेन बोलावण्यात आली. क्रेनमालकाचा भाऊ जावेद अत्तार व चालक अर्शफ अन्सारी क्रेन घेऊन आले. क्रेन त्याच वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटला आणि क्रेन थेट दरीत कोसळली. क्रेन दरीत कोसळत असताना आतील जावेद याने बाहेर उडी घेतली. मात्र, अंगावर क्रेनचे चाक चढल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यात चालक अर्शफ मात्र बालबाल बचावला. तो किरकोळ जखमी झाला.
क्रेनला झालेल्या अपघाताची माहिती समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेबाबत चंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. क्रेनचे मालक वाजीद यांनी अपघाताची चंदगड पोलिस ठाण्यात वर्दी दिली. त्यानुसार चालक अर्शफ याच्याविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.

मृतदेह २४ तास चाकाखाली
क्रेनची दुर्घटना काल सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मात्र, २४ तास उलटले तरीही मृतदेह क्रेनच्या चाकाखालीच होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com