
राऊळ यांना जनता ओळखून
swt1333.jpg
88872
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना बबन राणे, अनारोजीन लोबो, ॲड. नीता सावंत, बाबू कुडतरकर आदी. (छायाचित्र ःरुपेश हिराप)
राऊळ यांना जनता ओळखून
बबन राणेः केसरकरांवरील टिकेला भीक घालणार नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर कितीही आरोप झाले, तरी इथली जनता भीक घालणार नाही. कारण टीका करणारे काय आहेत हे जनता ओळखून आहे. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी राखून कित्येक वर्षे तालुकाप्रमुख पदाला चिकटून राहणाऱ्या आणि टक्केवारीवर कामे वाटणार्या रुपेश राऊळांवर काय बोलावे, अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी केले.
व्हॅल्युएशनने डबल झालेली प्रॉपर्टी वाढली असे होत नाही. मुळात राऊल कोणाच्या जीवावर मोठे झाले, भाड्याच्या खोलीत राहणाऱ्यांकडे फ्लॅट कसा काय आला, हे त्यांनी सांगावे. तुम्ही आहात इथे गुपचूप राहा, अन्यथा तुमची सर्व कुंडली बाहेर काढू, असा इशारा ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी दिला.
श्री. राणे यांनी आज मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनारोजीन लोबो, ॲड. नीता सावंत, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, गजानन नाटेकर, विनायक सावंत, मंगलदास देसाई आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, "मंत्री केसरकर हे ज्या पद्धतीने जिल्ह्यात काम करत आहेत, ते पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कुठलेही निराधार आरोप करत आहेत; परंतु विकास कोण करू शकतो, ही इथली जनता ओळखून आहे. जे कोण आरोप करत आहे, त्यांनी आजपर्यंत काय विकास केला, हे दाखवून द्यावे. उपऱ्यांनी उगाच बढाया मारू नये. केसरकर यांच्याकडे प्रॉपर्टी कुठून आली, असे राऊळ विचारत आहेत; मात्र केसरकर हे मुळातच श्रीमंत आहेत. त्यांना प्रॉपर्टी वाढविण्याची गरजच नाही. हेच राऊळ वरिष्ठांची मर्जी राखून गेली कित्येक वर्षे स्वतःकडे तालुकाप्रमुख पद सांभाळून का ठेवत होते, हे त्यांनी आधी सांगावे, दोन टक्क्याने ठेकेदाऱ्यांना कामे वाटणाऱ्यांवर बोलणे योग्य नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी अर्चना घारेंचे गोडवे गातात; मात्र याच अर्चना घारे भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थितीती लावतात."
लोबो यांनी, मंत्री केसरकारांवर टीका करणारे राऊळ कोणाच्या जीवावर मोठे झाले, हे त्यांनी आधी सांगावे. इतके दिवस भाड्याच्या खोलीत राहणारे राऊळ आज स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. हा बदल नेमका कशामुळे झाला, हे सांगावे. त्यामुळे राऊळ यांनी आपले काम करावे. मंत्री केसरकरांवर टीका केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. विरोधकांनीही विकासकामांवर बोलावे. उगाच वायफळ टीका करू नये. मंत्री केसरकर ज्या पद्धतीने आज काम करत आहेत, हे पाहून विरोधकांचा जळफळाट होत आहे, अशी टीका केली. व्हॅल्युएशनने प्रॉपर्टी वाढली, असे होत नाही. मुळातच श्रीमंत असल्याने त्यांना प्रॉपर्टी वाढवण्याची गरज नाही. शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टी विकल्या, असे ॲड. नीता सावंत म्हणाल्या.
चौकट
पुण्याच्या नेत्या सावंतवाडीत नको
मंत्री केसरकारांकडेच येऊन विकासकामे घेऊन जाणारे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दळवी हे त्यांच्यावरच टीका करतात, हे दुर्दैव आहे. दुसरीकडे अर्चना घारे-परब यांचे ते गोडवे गातात; परंतु इथली जनता पुण्यावरून आलेल्या बाहेरील नेत्याला स्वीकारणार नाही, हे स्पष्ट आहे. असे बाहेरून नेते आणून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने मंत्री केसरकरांवर बोलू नये, असा टोला लोबो यांनी लगावला.