
अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा
अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा
सावंतवाडीः शहरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी येथील पोलिसात दिली. संबंधित मुलगी मूळ कर्नाटकची असून तिचे वडील शहरालगतच्या एका गावात गवंडी काम करतात. ती त्यांच्यासोबत मोलमजुरी करत होती. आज अचानक ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी येथील पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
...............
मराठा मोर्चाची आज बैठक
कुडाळः येथे आना भोगले यांच्यावर दाखल अॅट्रॉसिटी खटल्याप्रकरणी पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक उद्या (ता. १४) येथे घेण्यात येणार असल्याचे व याला उपस्थितीचे आवाहन अॅड. सुहास सावंत यांनी केले. ही बैठक सायंकाळी ४ वाजता मराठा हॉल येथे होणार आहे.
..................