आपला ग्राहक ओळखा आणि उद्योग व्यवसाय वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपला ग्राहक ओळखा आणि उद्योग व्यवसाय वाढवा
आपला ग्राहक ओळखा आणि उद्योग व्यवसाय वाढवा

आपला ग्राहक ओळखा आणि उद्योग व्यवसाय वाढवा

sakal_logo
By

rat१४१२.txt


(८ मार्च टुडे पान तीन)

धरू कास उद्योजकतेची...........लोगो

rat१४p२३.jpg ः
८८९३७
प्रसाद जोग

ग्राहक ओळखा आणि उद्योग व्यवसाय वाढवा

उद्योग, व्यापार करत असताना सर्वात महत्वाचे असतात ते म्हणजे ग्राहक. कोणत्याही उद्योगात ग्राहकांना अनन्यसाधारण महत्व असते. ग्राहकाला तर देव आणि राजा यांच्या समान दर्जा दिला जातो. ग्राहक म्हणजे कोण? हे आपण आजच्या लेखात अभ्यासणार आहोत.

---
आज १५ मार्च जागतिक ग्राहक दिन. या दिनाच्या औचित्याने आपल्या कोकणातील प्रत्येक उद्योजकाने सजग होणे गरजेचे आहे. उद्योजकीय वाटचाल करत असताना ग्राहकांच्या गरजा, त्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या यांचा विचार करून प्रत्येक ग्राहक आपल्या आस्थापनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे याचा स्वीकार करून उद्योजकाने ग्राहक मिळवण्याची रणनीती आखणे गरजेचे आहे.
रणनीती आखताना प्रत्येक उद्योजकाने ग्राहकांच्या मानसशास्त्राचा, त्यांच्या खरेदी करण्याच्या वर्तनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. उद्योजक हा सुद्धा कोणाचा ना कोणाचा तरी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे ग्राहकच असतो म्हणून उद्योजकाने स्वतःचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बाजारात उतरवताना ग्राहकांच्या गरजांचा व त्यांच्या क्रय विक्रय शक्तीचा तसेच त्यांच्या आवडीचा आधी अंदाज घेणे गरजेचे आहे.
ग्राहक म्हणजे ग्रहण करणारा, वस्तू किंवा सेवा यांचे आकलन करून घेऊन खरेदी करणारा असे आपण म्हणू शकतो. ग्राहक म्हणजे एखादी वस्तू अथवा सेवा यांची माहिती समजावून घेऊन स्वतःच्या किंवा वापरकर्त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी स्वप्रेरणेने किंवा बाह्य प्रेरणेने एका ठराविक मोबदल्यात एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यास अनुकूल असणारी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह असेही म्हणता येईल. ग्राहक हा बाजारपेठेत आर्थिक उलाढाल करू शकणारा, अर्थकारणाला गती प्राप्त करून देणारा सर्वात महत्वाचा दुवा असतो.
ग्राहकाच्या समाधानाला केंद्रीभूत ठेवून जर उद्योगाचे नियोजन केले गेले तर निश्चितच यश मिळते. ग्राहकांना योग्य किंमत व उच्च गुणवत्ता व खरेदीदरम्यान योग्य अनुभव मिळाल्यास तसेच विक्रीपश्चात चांगली सेवा मिळाल्यास एक समाधानी ग्राहक अन्य १०० नवीन ग्राहकांना कळत नकळतपणे उद्योजकाच्या ब्रँडला जोडून देत असतो.
ग्राहक संबंध, ग्राहकांशी संवाद, ग्राहकांचे पूर्ण समाधान व ग्राहकांच्या हक्कांची जपणूक यांच्याकडे विशेषत्वाने लक्ष देणारा उद्योजक लोकल टू ग्लोबल मार्केटमध्ये आपले स्वतःचे असे वेगळे स्थान निश्चितच तयार करू शकतो. ग्राहक प्रोडक्ट किंवा सर्विस विकत घेत असताना सर्वात आधी सुरक्षेचा विचार करतो तसेच उद्योजकाच्या विश्वासार्हतेचा विचार करत असतो. ग्राहकाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस यांच्या संदर्भात, त्यांच्या उपयोगितेसंदर्भात, त्यांच्या शेल्फ लाईफ संदर्भात व त्यांच्या गुणवत्तेसंदर्भात विश्लेषणात्मक माहिती मिळवण्याचा हक्क असतो. खुल्या बाजारात उपभोक्त्याला व ग्राहकाला उपलब्ध असणाऱ्या वस्तू व सेवा यांमधून स्वतःला आवडणाऱ्या वस्तू अथवा सेवा यांची निवड करण्याचा मूलभूत अधिकार असतो तसेच खरेदीदरम्यान स्वतःचे म्हणणे विक्रेत्याजवळ मांडण्याचा व त्याच्याशी संवाद साधण्याचा अधिकार असतो. कोणत्याही कायदेशीर ग्राहकाला चुकीच्या सेवेबद्दल किंवा त्रुटी पूर्ण उत्पादनाबद्दल, फसवणुकीबद्दल ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याचा आणि त्याचे निवारण करून घेण्याचा हक्क असतो. ग्राहक म्हणून आपले हक्क कोणते आहेत हे जाणून घेण्याचा व ग्राहक हक्कांच्या संदर्भातील शिक्षणाचा अधिकार ग्राहकाला असतो. त्यामुळे या स्पर्धात्मक युगात उद्योजकतेची कास धरलेल्या उद्योजकांनी सर्वात प्रथम आपला नेमका ग्राहक कोण, त्याच्या आपल्या उत्पादनांकडून, सेवेकडून नक्की काय अपेक्षा आहेत याचाही जरूर विचार करायला हवा.
इंटरनेटमुळे जगाच्या पाठीवर कोणत्याही उद्योजकाला आपल्या कक्षा विस्तारून थेट जागतिक बाजारपेठेतून वैश्विक ग्राहक मिळवता येऊ शकतो. आपली प्रॉडक्टस् आणि सर्व्हिस जगात कोण कोण विकत घेऊ शकतो याचे भान उद्योजकाला ठेवून जागतिक बाजारपेठेतील ग्राहकाला आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी जागतिक स्तरावरील ग्राहकांच्या अभिरूचीचा व अद्ययावत विपणन तंत्राच्या वापराचा निश्चितपणे सखोल अभ्यास करावा लागतो. ग्राहकांच्या राहणीमानाचा, भाषेचा त्यांच्या गरजांचा परिपूर्ण अभ्यास करून विक्री व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा लागतो.

ग्राहक मिळवणे व टिकवण्यासाठी उद्योजकांनी करायलाच हव्यात या गोष्टी

१. ग्राहकांच्या गरजा व त्यांच्या पूर्णतेसाठी उपाययोजना कार्यान्वित करण्याचे धोरण आखून उत्कृष्टतेची हमी व अनुभूती देणे.
२. रचनात्मक पद्धतीने ग्राहक जागृती करून आपल्या ब्रँडच्या उपयोगितेचा व गुणवत्तेचा ठसा त्यांच्या मनात कोरणे.
३. ग्राहकांना आदर सन्मान देऊन ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तणुकीतून दर्शवून देणे.
४. ग्राहकांना प्रॉडक्ट किंवा सेवा वेळेत देता यावी यासाठी योग्य सिस्टीमचा अवलंब करणे.
५. आपल्या ग्राहकाला फिल गुड वाटावे म्हणून आपल्या कर्मचारीवर्गास ग्राहक हाताळणीचे योग्य मार्गदर्शक प्रशिक्षण देणे.
६. विक्री, संवाद, सादरीकरण, आदरातिथ्य, मानवी स्नेहसंबंध जपण्याचे कौशल्य शिकून घेऊन ग्राहकाला समाधानी ठेवणे
७. ग्राहक जोडो अभियान राबवणे.
८. ग्राहकांकडून फिडबॅक व रेफरंसेस मागून घेणे.
९. ग्राहकांच्या वेळेचा, भावनेचा मान राखणे.
१०. ग्राहकांनी एकनिष्ठ राहावे याकरिता त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन अधूनमधून सरप्राइज गिफ्ट देणे.


(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)