
बारा एकरमधील काजू झाडे वणव्यात खाक
rat१४१९.txt
फोटो
- rat१४p१९.jpg -
८८९३०
राजापूर ः तालुक्यातील ससाळे आंगले परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये भक्ष्यस्थानी पडलेली काजूची बाग.
बारा एकरमधील काजू झाडे वणव्यात खाक
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील ससाळे आंगले येथील जांभलीतिठा परिसरातील सुमारे १२ एकरमधील काजू झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक वणवा लागल्याने ससाळे व आंगले येथील शेतकऱ्यांच्या काजूबागा या वणव्यात जळून खाक झाल्या आहेत. सध्या काजू हंगाम ऐन बहरात आला असतानाच हा वणवा लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही काजू तर पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. गतवर्षीही या परिसरात वणवा लागल्याने काजू जळाले होते. येथील काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे या काजूपिक हंगामावरच अवलंबून असते. त्यामुळे बहरात आलेले काजूपिक वणव्यात जळून खाक झाले असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. हा वणवा सुमारे १० ते १२ एकरपेक्षाही जास्त परिसरात लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे.