सीए इन्स्टिट्यूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीए इन्स्टिट्यूट
सीए इन्स्टिट्यूट

सीए इन्स्टिट्यूट

sakal_logo
By

at१४२३.txt


rat१४p३०.jpg-
८८९५७
रत्नागिरी ः कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. प्रीती मुळ्ये. डावीकडून सीए मुकुंद मराठे, डॉ. निधी पटवर्धन, सीए अभिलाषा मुळ्ये.
(मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
--
महिलांनी ताणतणावाचे व्यवस्थापन करावे

डॉ. मुळ्ये; सीए इन्स्टिट्यूटतर्फे मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. १४ ः महिला अनेकदा आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात; पण कुटुंबात महिलेचे स्थान महत्वाचे असल्याने महिलांनी तब्येत सांभाळली पाहिजे. ताजे अन्न खावे. जेवताना फोनवर बोलू नका, शांतपणे जेवा. शरीराला नियमित व्यायाम आवश्यक आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. महिलांनी ताणतणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करायला शिकावे, असे मार्गदर्शन डॉ. प्रीती मुळ्ये यांनी केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यामध्ये आनंदी जीवन कसे जगावे आणि निरोगी आयुष्यासाठी महिलांनी आहार, पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी तज्ज्ञ महिलांनी मार्गदर्शन केले. हॉटेल मथुरा एक्झिक्युटिव्हच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या वेळी डॉ. प्रा. निधी पटवर्धन यांनी महिलांना नित्यनियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा केली पाहिजे तसेच आनंदी जगणे ही एक कला आहे. ती प्रत्येक महिलेने शिकून घ्यावी असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी भेट दिली. सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी महिला सीए आणि महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. सीए मीनल काळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शाखा सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांच्यासह महिला सीए, विद्यार्थिनी आणि सीए फर्ममधील महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.