गुहागर तालुका शिवसेना सचिवपदी संतोष आग्रे यांची निवड

गुहागर तालुका शिवसेना सचिवपदी संतोष आग्रे यांची निवड

rat१४२५.txt


-rat१४p३१.jpg ः
८८९५८
गुहागर ः जीएचआर १२-१ शिवसेना तालुका सचिवपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सोबत महिला जिल्हा संघटक रश्मी गोखले, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर.
-
गुहागर तालुका शिवसेना सचिवपदी संतोष आग्रे

गुहागर, ता. १४ ः गुहागर तालुका शिवसेनेच्या सचिवपदी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समर्थक असणारे संतोष आग्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या पालकमंत्री पदी उदय सामंत यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. शिवसेना व धनुष्यबाण हे शिंदे यांच्याकडेच राहिल्याने राज्यासह जिल्हा व तालुक्यात कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्याचा ओढा वाढला आहे. गुहागर तालुक्यात तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढत आहे. पालकमंत्री सामंत यांनी नुकतीच तालुका सचिवपदी संतोष आग्रे यांची नियुक्ती केली. आग्रे हे कट्टर शिवसैनिक माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आग्रे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आग्रे यांना सचिवपदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले.
या वेळी युवा तालुकाप्रमुख रोहन भोसले, अरदीप परचुरे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे, सुशील आग्रे, नीलेश मोरे, राजू धामणस्कर, सुभाष काजरोळकर, अरूण भुवड, नरेश पवार, संदीप भोसले, उमेश किल्लेकर, जय काजरोलकर व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. नियुक्तीनंतर आग्रे यांनी पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला तो येत्या काळात सार्थ ठरवू तसेच शिवसेना तालुक्याच्या प्रत्येक घरघरात पोचवण्याचे काम करू, असा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com