दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व विनायक राऊत

दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व विनायक राऊत

पुरवणी डोकेः मा. खासदार विनायक राऊत वाढदिवस विशेष

swt147.jpg व swt1413.jpg
88979, L88970
विनायक राऊत

swt148.jpg
88980
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत.

swt149.jpg
88981
कन्या रुची राऊतसमवेत विनायक राऊत.

swt1410.jpg
88967
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत खासदार विनायक राऊत.

swt1411.jpg
88968
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमवेत खासदार विनायक राऊत.

swt1412.jpg
88969
बैलगाडीतून सफरप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर.


दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व विनायक राऊत

लीड
कोकणचे वैभव, महामेरू, सर्वच क्षेत्रात विद्वत्तेने परिपूर्ण अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सर्वाना सोबत घेऊन काम करणारे, शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची राजकारणातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात ख्याती आहे, असे दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे संसदपटू शिवसेना (ठाकरे गट) सचिव तथा खासदार विनायक राऊत. बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांची लोकसभेतील वाटचाल कौतुकास्पद आहे. लोकसभेतील हा बुलंद आवाज नेहमीच कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी झटलेला आहे आणि आजही झटत आहे. बुधवारी (ता.१५) त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...
- नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते, उध्दव ठाकरे शिवसेना
-------------
खासदार विनायक राऊत यांचा जन्म तळगावमध्ये झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांप्रमाणेच ते मुंबईला गेले. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन सांताक्रूझच्या (मुंबई) शाखेत ते दाखल झाले. शिवसेना हे एक मंदिर आहे आणि बाळासाहेब हे आपले दैवत आहेत, हा विचार त्यांनी मनाशी बिंबवला आणि त्यानंतर शाखाप्रमुख, एक टर्म नगरसेवक, दुसरी टर्म पत्नी नगरसेवक, त्यानंतर संपर्क प्रमुख ही संघटनात्मक जबाबदारी पक्षाने त्यांना दिली. ही जबाबदारी पेलत त्यांनी ६ ते ८ आमदार निवडून आणले. त्यानंतर विभाग प्रमुख असताना सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले. अशाप्रकारे सर्वोत्कृष्ठ कामगिरीसाठी बाळासाहेबांनी त्यांचा सत्कार सुद्धा केला होता. त्यानंतर ते विधानसभा आमदार झाले. आपल्या मतदार संघात कामांचा पाऊस पाडला. अनेक विकासाच्या नवनवीन कल्पना राबवल्या. आजही मुंबईमध्ये जी दोन अॅक्वारिअम (Aquarium) आहेत, त्यातील एक पार्ले विधानसभा मतदार संघात राऊत यांनी बनवलेले आहे. एवढे चांगले काम करूनही पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी प्रामाणिकपणे झटणारा हा नेता दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीत पराभूत झाला. पराभवाची खंत असली तरी शिवसेना हाच ध्यास, बाळासाहेब हे दैवत व आपल्यावर प्रेम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हा श्वास असल्यामुळे पराभवाची तमा न बाळगता आपले जीवन हे शिवसेनेसाठीच आहे, या भावनेतून ते काम करत राहिले. शिवसेनेची धुरा उद्भवजींसारख्या शांत, संयमी व दृष्ट्या नेत्याच्या खांद्यावर आली होती. कालानुरूप समाजात बदल घडत असतात हे जाणून त्यांनी पक्षामध्येसुद्धा त्याप्रमाणे बदल घडविण्यास सुरुवात केली. बाळासाहेबांनी राऊत यांची पक्ष सचिवपदी नेमणूक केली आणि संपूर्ण राज्यात पक्षाच्या कामासाठी प्रवास सुरु झाला. दिलेली जबाबदारी झोकून देऊन पार पाडायची सवय असल्यामुळे पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या भागामध्ये ज्याठिकाणी हॉटेल नाही, रेस्ट हाऊस तर कोणी देतच नव्हते तेथे झाडाखाली चूल पेटवून बरोबर नेलेली भांडी व सामुग्रीने भात शिजवून, दहीभात खाऊन पक्षाचे काम केले. त्याभागातील प्रचंड उष्णतेचा त्रास होऊ नये, म्हणून रुमाल पाण्याने भिजवून तो शर्टाच्या कॉलरमध्ये ठेऊन सुद्धा काम केले. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून आज शिवसैनिक त्यांच्या संपर्कात आहेत. आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून शिवसैनिक येतात, भेटतात आणि आपली कामे करून घेतात. त्यांच्या आदरातिथ्यात श्री. राऊत रमलेले दिसतात.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. त्यावेळी आपण शेतकऱ्यांसाठी काम करुया, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुचवले आणि अनेक प्रचंड गर्दीचे शेतकरी मेळावे राज्यात आयोजित केले. हे सर्व होत असताना एके दिवशी बातमी आली, ‘विधान परिषदेसाठी विनायक राऊत यांनी वर्णी’. सवयीप्रमाणे बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यावर साहेबांचा आदेश झाला, ‘विनायक तू आता कोकणात जा आणि तेथे लक्ष घाल.’ साहेबांचा आदेश झाल्यावर तेथे विचार करत न थांबता, क्षणाचाही विचार न करता, आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द मुंबईत स्थावर झाली असताना सुद्धा ते तळगाव मुक्कामी दाखल झाले. आपल्या अनेक वर्षांच्या संघटना कौशल्यावर व सहकारी अरुण दुधवडकर, वैभव नाईक, शैलेश परब, राजन साळवी, सदानंद चव्हाण, सुधीर मोरे यांच्या साथीने संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग पिंजून काढला. अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरून शिवसैनिक एकत्र केला. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. कोणाच्या अरेला कारे करण्यासाठी जे पाठबळ लागते ते भक्कम पाठबळ शिवसैनिकांच्या पाठीशी उभे केले.
आत्ताचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ म्हणजे पुर्वीचा राजापूर मतदार संघ. या मतदार संघाला बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते यांची उज्वल परंपरा लाभलेली आहे. आपल्या कर्तृत्ववाने त्यांनी या मतदार संघाचे नाव संपूर्ण देशात गाजवले. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी सुद्धा तीच वहिवाट कायम केली. त्यामुळे या मतदार संघाचा खासदार म्हणून जबाबदारी घेणे सोपी गोष्ट नव्हती. त्यातही कोकणी मतदार अतिशय चोखंदळ, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हा इथला बाणा. भले एकदा निवडून देतील. परंतु, काम दाखवता नाही आले तर लगेच श्राद्धही घालतील. त्यामुळे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेच्या लायब्ररीमध्ये जाऊन बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते यांची संसदेतील भाषणे त्यांनी वाचली. त्यांचा अभ्यास केला. त्यातून असे लक्षात आले की आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशातील प्रश्नांची उकल केली. बॅरिस्टर नाथ पै यांच्या विद्वत्तेचा राष्ट्राच्या जडणघडणीत उपयोग झाला. प्रा. दंडवते यांच्या रुपात एक आदर्श अर्थमंत्री देशाला या मतदार संघाचे दिला. परंतु, या मतदार संघाला न्याय द्यायचा असेल तर इथल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी खेड्यापाड्यात गेले पाहिजे आणि त्यादिवसापासून खेडच्या परशुराम घाटापासून ते गोव्याच्या सीमेपर्यंत विस्तारलेल्या या ३५० किलोमीटरच्या संपूर्ण मतदारसंघात प्रवास सुरु झाला. मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये जाणे, त्यातील वसलेल्या प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना अपेक्षित काय आहे, हे जाणून घेणे हा दिनक्रम बनला.
कोणत्याही वटवृक्षाला कितीही पारंब्या आल्या तरी त्याचा खरा आधार हा त्याचा बुंधा म्हणजेच खोड हाच असतो व तो बुंधा आपले खासदार विनायक राऊत व त्यांचे सिंधुदुर्गातील खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी व आपण सर्व शिवसैनिक आहोत.
आज आपले वाढदिवस अभिष्टचिंतन करीत असताना सांगावेसे वाटते की, ‘सह्याद्रीची उत्तुंगता, अरबी सागराची विशालता आपल्या ठायी आहेच. पण, त्याहीपेक्षा आपल्या विनम्र व सृजनशील स्वभावामुळेच आपण आज जनतेच्या मनावर अधिराज्य करता आहात. कोकणचा वि''नायक'' म्हणून काम करत असताना आपल्या हातून अशीच लोकसेवा घडो, विकासाच्या अनेक नवनवीन संकल्पना आपल्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आकारास येऊन येथे आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यटन व त्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी तयार होवोत व हे सर्व साकार करण्यासाठी आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई जगदंबेकडे प्रार्थना...
---------------
चौकट
विकास कामांवर एक नजर
* खेड्यापाड्यात कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा हा ग्रामीण व शहरी भागातील लोकांचा ज्वलंत प्रश्न होता. केंद्राच्या माध्यमातून विद्युत बळकटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
* कोलमडलेली दूरध्वनी यंत्रणा हा कळीचा मुद्दा होता. नादुरुस्त मोबाईल टॉवर दुरुस्त करणे, त्याचबरोबर नवीन मोबाईल टॉवर उभे करणे आवश्यक होते. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये बीएसएनएलधारकांची सर्वाधिक असलेली संख्या व डोंगराळ भूभाग हा मुद्दा संसदेमध्ये मांडून जुने टॉवर दुरुस्त करण्याबरोबरच नवीन १०४ हुन अधिक टॉवर मंजूर
* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांनी व्यथित होऊन पक्ष प्रमुखांच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महामार्ग चौपदरीकरण मंजूर
* चिपी विमानतळाचा पाठपुरावा सुरू झाला व मागील १२ वर्षात केवळ १८ टक्के झालेले काम पुढील ६ वर्षात पूर्ण होऊन विमान सेवा सुरू
* लालफितीमध्ये अडकून पडलेल्या घोटगे-सोनवडे घाटाला चालना देत असतानाच लोकांच्या आग्रहामुळे आंजीवडे घाटाचा पाठपुरावा
* वराड-सोनवडे पुलाचा प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षे प्रलंबित होता. त्याचा यशस्वी पाठपुरावा
* जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना हे शिक्षण घेता येईल व त्यामाध्यमातून सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा जिल्ह्याला मिळेल या हेतूने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकारी मेडिकल कॉलेज मंजूर करून घेऊन केंद्राच्या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी जीवाचे रान केले व त्यातून मेडिकल कॉलेज सुरू
* तत्कालीन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून दोडामार्ग येथे राष्ट्रीय वनौषधी प्रकल्प मंजूर
* केंद्राच्या स्वदेश भ्रमण योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे ९९ कोटी निधी मंजूर करून घेतला.
* जिल्ह्यातील दिव्यांगांना केंद्राच्या योजनेतून अनेक प्रकारची उपकरणे देण्यासाठी मेळावा घेऊन दिव्यांगांना मदत
* जिल्ह्यात सुरवातीच्या काळात जंगली हत्तींनी उच्छाद मांडला होता. त्या हत्तींना जेरबंद मोहीम राबवली
* संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत शिवापूर दत्तक घेऊन मुख्य सडक सहित, अंतर्गत रस्ते, दिवा बत्ती, नळपाणी योजना, व्यायामशाळा, अंगणवाडीसारखी अनेक कामे पूर्ण करत असतानाच बचतगटांना रोजगार प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले. त्यातील काही बचतगट आज राज्यस्तरावर नावारूपास आले आहेत.
----------
(पुरवणी संकलनः अजय सावंत, कुडाळ)
----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com