मुंबईत ‘शिवोत्सव’ उत्साहात

मुंबईत ‘शिवोत्सव’ उत्साहात

88975
मुंबई ः येथे शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

मुंबईत ‘शिवोत्सव’ उत्साहात
कुडाळ ः राजीव यशवंत पाटील शैक्षणिक व सांस्कृतिक कला, क्रीडा संस्था आयोजित श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अमेय क्लासिक क्लब, विरार व स्थानिक कामगार संघ यांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) विविध उपक्रमांनी साजरा झाला. शिवोत्सवाच्या निमित्ताने शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन राजघराणी व ब्रिटिश, भारतीय नाणी, गड-किल्ल्यांची छायाचित्रे, शिवकालीन ऐतिहासिक मोडी लिपीतील पत्रांचे प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन व विक्री, किल्ला बांधणी, रांगोळीतून शिवचरित्र, भव्य मिरवणूक (लेझीम पथक, संबळ, तुतारी व पारंपरिक वेशभूषा), छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाटक ‘शिवगर्जना एक धगधगता प्रवाह’, ‘बेलवडणीची सावित्रीबाई’ यावर इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांचे व्याख्यान, पंकज भोसले व कुटुंबीयांचे ‘शिवबावनी’ सादरीकरण, प्रणय शेलार (शिवगर्जना तालीम) यांच्यातर्फे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, इतिहासतज्ज्ञ सौरभ कर्डे यांचे व्याख्यान, प्रवीण फणसे व कुटुंबीयांचा पोवाडा आदी कार्यक्रम झाल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. शिवरायांनी तानाजी मालुसरेंच्या देहावर अर्पण केलेली कवड्यांची माळ खास आकर्षण ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com