चराठा शाळेत गुणवंतांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चराठा शाळेत गुणवंतांचा गौरव
चराठा शाळेत गुणवंतांचा गौरव

चराठा शाळेत गुणवंतांचा गौरव

sakal_logo
By

88977
चराठा ः येथील आंतरराष्ट्रीय शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

चराठा शाळेत गुणवंतांचा गौरव
सावंतवाडी ः भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठा नं. १ मध्ये २०१२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच २०२२-२३ मधील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविलेल्यांचा सन्मान आणि शालेय स्तरावरील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाला सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच अमित परब, माजी पंचायत समिती सदस्या गौरी पावसकर, माजी सरपंच रघुनाथ वाळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर नाईक, उपाध्यक्ष गीता कुबल, केंद्रप्रमुख नरेंद्र सावते, चंद्रकांत वेगरे, वृंदा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या वृंदा मेस्त्री, श्रावणी बिर्जे, दिगंबर पावसकर, वर्षा देसाई, मोहन परब आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी सर्व बक्षिसे दाजी वेजरे यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत वेजरे यांनी पुरस्कृत केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षकांचा सत्कार झाला. अनघा निवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कोरगावकर यांनी आभार मानले.
................
सावित्रीबाई फुलेंना आरोंदात अभिवादन
सावंतवाडी ः आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरोंदा क्रांतिज्योती हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ तांबे, मळेवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी साळस्कर, आजगाव विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका साळवी, बीआरसी सावंतवाडीच्या श्रीमती सातार्डेकर आदी उपस्थित होते. आंगणे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीतांचे गायन केले. कलाशिक्षक चंदन गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तांबे यांनी आभार मानले.