‘बाबरपीर ब्लास्टर्स’ क्रिकेटमध्ये विजेता

‘बाबरपीर ब्लास्टर्स’ क्रिकेटमध्ये विजेता

88978
मडुरा ः क्रिकेट स्पर्धेतील विजेता बाबरपीर ब्लास्टर्स संघ चषकासह. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘बाबरपीर ब्लास्टर्स’ क्रिकेटमध्ये विजेता

मडुरा-बाबरवाडी प्रीमियर लीग; गौरेश वॉरियर्स उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः मडुरा-बाबरवाडी येथील ओंकार नवयुवक मंडळ आयोजित बाबरवाडी-प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘बाबरपीर ब्लास्टर्स’ संघ विजेता ठरला. ‘गौरेश वॉरियर्स’ संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोकण रेल्वे कर्मचारी तानाजी गावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, रमाकांत धुरी, पिंटो परब, संघमालक तानाजी धुरी, प्रवीण धुरी, शैलेश धुरी, प्रथमेश नाईक, दिगंबर धुरी, अमित धुरी उपस्थित होते. अंतिम सामना चुरशीचा झाला. सुपर ओव्हरमध्ये बाबरपीर ब्लास्टर्स संघाने गौरेश वॉरियर्सवर थरारक विजय मिळविला. तानाजी गावडे व मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज दिवेश धुरी, फलंदाज प्रमोद धुरी, मालिकावीर ओंकार नाईक, उदयोन्मुख खेळाडू अनुप नाईक, उत्कृष्ट झेल भरत नाईक यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत गणेश सातार्डेकर व प्रणव परब यांनी समालोचन केले. प्रवीण परब व योगेश तळवणेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तुषार धुरी, उपाध्यक्ष प्रमोद धुरी, सचिव अमित धुरी, खजिनदार दिगंबर धुरी, रितेश पावसकर, सागर धुरी, स्वप्नील धुरी, नीलेश कवठणकर, प्रसाद धुरी, अमित धुरी, संजय धुरी, भरत नाईक, आपा धुरी, अण्णा नाईक, किशोर धुरी, रामदास शेळके, लाडू धुरी, आशिष धुरी यांनी मेहनत घेतली. यावेळी दोरी उडी या क्रीडा प्रकारामध्ये देशस्तरावर यश संपादन केलेल्या चिन्मय धुरी याला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोवा कला अकादमी आयोजित ५३ व्या मराठी ''ब'' गट नाट्य स्पर्धेत दुर्वा थिएटर्सने सादर केलेल्या ''द कॉन्शन्स'' या नाट्यप्रयोगात उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक प्राप्त योगेश धुरी यांना गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com