बेती-गोव्यात ''शिवमहायाग'' उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेती-गोव्यात ''शिवमहायाग'' उत्साहात
बेती-गोव्यात ''शिवमहायाग'' उत्साहात

बेती-गोव्यात ''शिवमहायाग'' उत्साहात

sakal_logo
By

88971
गोवा ः येथे आयोजित शिवमहायागात श्रीपाद नाईक, रोहन खवंटे, सद्गुरू गावडे काका महाराज यांनी दर्शन घेतले.
--
८८९७२
दुसऱ्या छायाचित्रात ‘शिवमहायागा’त सहभागी भाविक.


बेती येथे ‘शिवमहायाग’ उत्साहात

गोव्याची देवभूमी; श्री स्वामी समर्थ सेवा न्यासचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः गोव्याच्या देवभूमीत बेती येथे १०८ यज्ञकुंडांचा शिवमहायाग भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. श्री श्री १०८ महंत मठाधिश सदगुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून व श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास यांच्या आयोजनातून शिवमहायाग करण्यात आला.
यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार केदार नाईक, पेन्ह दी फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, उपसरपंच दीपाली वेर्णेकर, बांदा माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, अमित कोरगावकर, गिरिधर गावडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, अध्यात्म ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपण ज्या भक्तिभावाने स्वामी मार्ग पत्करू, तोच भाव आपणाला भविष्यात तारणार आहे. म्हणून समाजासाठी आपणाला जे काही करता येईल ते आपण केले पाहिजे. मंत्री खवंटे यांनी समाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी योग्य गुरूची आवश्यकता असते. हाच भक्तिमार्ग गोव्यात रुजविण्यासाठी सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी घेतलेला पुढाकार आम्हा सर्व गोवावासीयांसाठी मोठा आशीर्वाद आहे, असे सांगितले. जीवनात एकाच वेळी १०८ यज्ञकुंडांचा महाशिवयाग प्रत्यक्ष पाहुन सहभागी होण्याचे भाग्य लाभले असून हा लोक कल्याणकारी महायाग समस्त गोमांतकीय आणि देशातील जनतेसाठी कल्याणकारी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी या शिवमहायागाच्या पूर्वसंध्येला भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन केले. २५ देशांत प्रसिद्ध असलेले केरळ राज्यातील पुरोहित श्री जीत लंबोदरी व त्यांच्यासोबत असलेल्या पुरोहितांच्या मंत्रघोषात हा महाशिवयाग पार पडला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ‘न भूतो न भविष्यती’ असा धार्मिक, विधीवत याग झाला‌. समाजातील दु:ख, दारिद्र्य दूर व्हावे व सर्वांना चांगले आरोग्य, समृध्दी लाभावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी या मंदिरासाठी आपल्या स्वमालकीची जमीन दात्रुत्व भावनेने दान देणाऱ्या नाईक मिरसकर कुटुंबीयांसह पुरोहित श्री जीत लंबोदरी, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, प्रिती कुशे, विनायक परब (वास्तुविषारद), एकनाथ गावडे, राजन गावडे, बापू गावकर, सुरेश नारुरकर, बंड्या सावंत यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन महेश अवखले, अनुपा पार्सेकर यांनी केले. श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे सचिव राकेश केसकर यांनी आभार मानले.
---
अध्यात्म जाणावे ः गावडेकाका महाराज
गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो स्वामीभक्त या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झाले. श्री श्री १०८ महंत प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी अमृततुल्य असे मार्गदर्शन केले. भक्ती मार्ग हाच खरा मुक्ती मार्ग आहे. श्रद्धा, भावना, विश्वास जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. देव-देवस्कीच्या मागे न लागता अध्यात्म जाणा. दीन दुबळे, ललित, पीडितांना सहकार्य करा. स्वामी सेवेत निरंतर राहा‌. आपणा सर्वांना मिळून या एक वर्षात या ठिकाणचे सकंल्पित स्वामी मंदिर पूर्ण करायचे आहे, असे सांगितले.