
सायबर गुन्हेगारीबाबत देवगडमध्ये जनजागृती
88973
देवगड ः येथील बसस्थानकावर पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हेगारीबाबत
देवगडमध्ये जनजागृती
देवगड, ता. १४ ः अलीकडे वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथील पोलिसांकडून समाजात जनजागृती सुरू आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत आवाहन करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्यासह त्यांचे पथक जनजागृती मोहीम राबवित असल्याचे सांगण्यात आले.
अलीकडे सायबर गुन्हेगारीचे प्रस्थ वाढत आहे. अज्ञातांकडून फसवणुकीसाठी नवनवे मार्ग अवलंबिले जात आहेत. यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम येथील पोलिस राबवित आहेत. स्थानिक नागरिकांबरोबरच रिक्षा व्यावसायिक, येथील बसस्थानक परिसर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेविषयी पोलिस निरीक्षक बगळे यांनी माहिती दिली. यामध्ये हवालदार एफ. जी. आगा यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.