
वाहतूक कोंडीवर सरपंच राऊतांचा उपाय
rat1421.txt
- rat14p21.jpg -
88932
राजापूर ः रस्त्याच्या कडेला सुयोग्य नियोजन करून बसवलेल्या जैतापूरचा आठवडा बाजार.
जैतापूर आठवडा बाजाराचे योग्य नियोजन
सरपंच राऊत यांचा पुढाकार ; वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी
राजापूर, ता. 14 ः जैतापूर आठवडा बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे ग्राहकांची गैरसोय होत होती. बाजारातील सुयोग्य नियोजनाची गरज लक्षात घेउन जैतापूरचे नवनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत यांनी पावले उचलली. स्थानिक तरुणांना सोबत घेत व्यापाऱ्यांना योग्य जागा दिल्या. त्यामुळे ऐसपैस जागा झाली असून वाहतूककोंडीही होत नाही.
जैतापूर आठवडा बाजारात येणारे व्यापारी मिळेल त्या जागी दुकाने थाटत होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होत होती. याचा त्रास वाहन चालकांसह बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांनाही होत होता. त्यामुळे या बाजाराच्या सुयोग्य नियोजनाची गरज होती. जैतापूरचे सरपंच राजप्रसाद राऊत यांनी तरुणांना सोबत घेत या बाजाराचे सुयोग्य नियोजन केले. व्यापाऱ्यांसाठी जागेची आखणी करून घेतली. यावेळी स्वतः सरपंच राऊत यांनी उपस्थित होते. व्यापाऱ्यांना याची कल्पना देत सर्वांना जागेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे बाजारपेठेत सुंदर चित्र निर्माण झाले आहे. यासाठी शाखाप्रमुख प्रसाद करगुटकर, युवासेनेचे तालुका समन्वयक प्रसाद मांजरेकर, श्रीकृष्ण राऊत, संतोष पाटील, राकेश दांडेकर, गजानन करमळकर, स्वप्नील करगुटकर, राजेश करगुटकर, सुनील करगुटकर, शिपाई देविदास मांजरेकर आदींनी सहकार्य केले. तसेच निवडून आल्या आल्या जैतापूरमध्ये स्ट्रीटलाईटची व्यवस्था करून दिल्याबद्दल सुद्धा समाधान व्यक्त होत आहे. जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनीसुद्धा त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले आहे.