गणित ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये शिडवणे शाळेतील मुलांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
शिडवणे शाळेतील मुलांचे यश
गणित ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये शिडवणे शाळेतील मुलांचे यश

गणित ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये शिडवणे शाळेतील मुलांचे यश

sakal_logo
By

89014
कणकवली ः गणित अध्ययन संस्थेकडून सन्मानचिन्ह स्वीकारताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ शाळेचे विद्यार्थी व शिक्षक.

गणित ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
शिडवणे शाळेतील मुलांचे यश
तळेरे ः अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या आर्थिक सहाय्यातून गणित अध्ययन संस्था गणित विषयक ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करीत असते. पाचवीच्या वर्गाची ऑलिम्पिक स्पर्धा कणकवली क्रमांक ३ शाळेत झाली. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे क्रमांक १ शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळविला. शिडवणे प्राथमिक शाळेतील वेदांत कुडतरकर, श्रेया पाळेकर, सुशांत गुंडये, फरान शेख, केतन सुतार, सार्थक धुमाळ, सर्वेश पाष्टे, हर्षद रांबाडे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. याबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले. पाचवीच्या वर्गशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि पाचवीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी अभिनंदन केले.
--------------
89015
मुंबई ः काळाचौकी येथे विजय सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

विजय सावंतांना आदर्श शिक्षक पुरस्कार
दोडामार्ग ः अहिल्या शिक्षण केंद्राचे संस्थापक (कै.) आत्माराम मोरजकर यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबई-काळाचौकी येथे शिक्षक गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता. यात तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र विजय सावंत यांचा द. ग. सावंत यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.