रविवारी रायपाटण गावचे शिंपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारी रायपाटण गावचे शिंपणे
रविवारी रायपाटण गावचे शिंपणे

रविवारी रायपाटण गावचे शिंपणे

sakal_logo
By

rat१४६.TXT

बातमी क्र. ६ (संक्षिप्त)

रविवारी रायपाटण गावचे शिंपणे
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण गावचे शिंपणे हे रविवारी (ता. १९) होणार आहे. होळी उत्सवानिमित्त रायपाटणमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावची ग्रामदेवता श्री वडची आई देवीची पालखी प्रत्येक वाडीतील घराघरात भेटीसाठी जात असून दररोज रात्री होळीच्या मांडावर घुमटासह तमाशाचा खेळ पालखी नृत्य असे कार्यक्रम पार पडत आहे. शिंपण्याच्या दिवशी होळीवरील रोमटाचा खेळ खास आकर्षणाचा भाग असतो त्या व्यतिरीक्त जमीनीवरील रोमट रात्री धुळवडीचे रोमट त्याच्या आदल्या दिवशी वीराचे रोमट असते. शिंपण्याच्या दिवशी रात्रभर कार्यक्रम सुरु असतात. दिवट्यांचा कार्यक्रम त्यानंतर विविध सोंगे काढणे आणि पहाटे सर्व कार्यक्रम संपल्यावर पालखी मंदिराकडे मार्गस्थ होते असे कार्यक्रम पार पडतात.

-
प. दीनदयाल रोजगार मेळावा
१९ ला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्यातर्फे जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनांकडून ४०० हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. १० वी , १२ वी, पदवीधर, आयटीआय, इंजिनिअर व इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जिल्हयातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या http:/www.mahaswayamgov.in या पोर्टलवर करावी. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांचेकडील युझर आयडी व पासवर्ड च्या साह्याने १९ मार्चला मुलाखतीकरीता बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.