रत्नागिरी- ग्राऊंड रिपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ग्राऊंड रिपोर्ट
रत्नागिरी- ग्राऊंड रिपोर्ट

रत्नागिरी- ग्राऊंड रिपोर्ट

sakal_logo
By

-rat१४p२.jpg- KOP२३L८८९२०
रत्नागिरी ः उद्यमनगर येथील संसारे उद्यानात बंदावस्थेतील कारंजी.
-rat१४p३.jpg ः KOP२३L८८९२१
संसारे उद्यानात कासवाच्या शिल्पाभोवती झाडीझुडपे.
- rat१४p६.jpg ःKOP२३L८८९१३
जिजामाता उद्यान सुस्थितीत असल्याने येथे सूर्यास्त पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते.
-rat१४p९.jpg ः KOP२३L८८९१६
माळनाका येथील शिर्के उद्यानातील मोडलेली खेळणी.
- rat१४p१३.jpg ः KOP२३L८८९२४
लक्ष्मीचौक उद्यानात खराब झालेली खेळणी, लोखंडी सामान टाकून ठेवले आहे.
- rat१४p१७.jpg ः KOP२३L८८९२८
फडके उद्यानामध्ये कारंजा व परिसराची स्थिती दयनीय आहे.

---------
ग्राऊंड रिपोर्ट------लोगो- ८ मार्च टुडे पान१ वरून घेणे.....

इंट्रो

वाढत्या शहरीकरणात माणूस निसर्गापासून दूर जातो. त्या वेळी विरंगुळा म्हणून उद्याने, बागांमध्ये जातो. लहान मुलांना तर बागेत खेळायला, हुंदडायला आवडते. त्यामुळे मुलांची संख्या बागेत जास्त पाहायला मिळते. शनिवार, रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रत्नागिरीतील मुले आणि पर्यटकसुद्धा बागेत जाताना पाहायला मिळतात. रत्नागिरी शहराचा विचार करता ४० लहान, मोठी उद्याने आहेत. त्यातील काही उद्याने अतिशय सुरेख आहेत; परंतु काही उद्यानांची स्थिती फारशी चांगली नाही. तेथील खेळणीही मोडली आहेत, कारंजी बंद आहेत आणि अस्वच्छताही आहे. याकडे पालिकेने पुरेसे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची गरज आहे.

- मकरंद पटवर्धन, रत्नागिरी


रत्नागिरीतील उद्यानांची दूरवस्था

नगरपालिकेकडून प्रतिक्षा देखभाल दुरुस्तीची ः शहरात ४० हून अधिक उद्याने

रत्नागिरी शहरात पूर्वीच्या काळात काही ठराविकच बागा होत्या; परंतु २००८ नंतर जिजामाता उद्यान व पुढे नवनवीन उद्याने साकारू लागली. शासनाच्या नियमांनुसार नवीन प्लॉटिंग झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी एक उद्यान साकारण्यात येऊ लागले. बागा नवीन असल्या की त्याकडे लक्ष दिले जाते; पण हळुहळू दुर्लक्ष होते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बागांकडे पालिका प्रशासनाने आराखडा आखून लक्ष देण्याची गरज आहे.
सन्मित्रनगर येथील (कै.) लक्ष्मण वा. लिमये हे उद्यान अतिशय सुरेख साकारले आहे. येथे चांगली खेळणी आहेत. उद्यानात हिरवळही भरपूर प्रमाणात आहे. आसपास राहणारे अनेक लोक येथे फिरण्यासाठी येतात. आंब्याच्या मोठ्या झाडांमुळे येथे सावलीसुद्धा चांगली मिळते. या बागेला रत्नागिरीकरांची पसंती आहे. या बागेकडे स्थानिक नगरसेवकांचे लक्ष असते.

संसारे उद्यानाची गेली शोभा
मारूती मंदिर- उद्यमनगर परिसरातील समाजसेवक (कै.) रघुनाथ तथा बाबुशेठ संसारे उद्यान या सुप्रसिद्ध उद्यानात झाडे, हिरवळीचे जतन चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. गाजावाजा करून बागेचे उद्घाटन करण्यात आले होते; परंतु काही खेळणी मोडली आहेत, झोपाळे नाहीत, कारंजी बंदावस्थेत पाहायला मिळाली. येथे लहान मुलांसाठी घसरगुंडी सुस्थितीत आहे. येथे मोठ्या शीळेत साकारलेले कासव बसवण्यात आले आहेत. त्याच्याभोवती खुरटी झाडेझुडपे वाढलेली आहेत. पूर्वी सुस्थितीत असणारी व रंगीबेरंगी कारंजी आता बंदच आहेत. एका कारंजाच्या मोकळ्या भागात प्लास्टिक बाटल्या, पिशव्या टाकण्यात आल्या असून त्यामुळे या उद्यानाची शोभा गेली आहे. दगडाच्या एका बाजूच्या कोपऱ्यात कार्यक्रम करण्यासाठी खुला रंगमंच व प्रेक्षकांना बसण्यासाठी उतरत्या पायऱ्यांची व्यवस्था केली आहे; मात्र येथे अस्वच्छता, धुरळा आणि खुरटी झाडीझुडपे वाढलेली पाहायला मिळाली. या चांगल्या उद्यानाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज फिरायला आलेल्या रत्नागिरीकरांनी व्यक्त केली.

जिजामाता उद्यानात नेहमीच वर्दळ
थिबा पॉईंट येथील जिजामाता उद्यान उत्तमप्रकारे जतन केले आहे. शहरातील सर्व उद्यानांची देखभाल, दुरुस्ती नगरपालिका करत असली तरी जिजामाता उद्यान खासगी कंत्राटदारांकडे चालवण्यास दिले आहे. येथे ५ व १० रुपये तिकीट आकारून प्रवेश दिला जातो. येथे लहान मुलांसाठी भरपूर खेळणी आहेत. रेल्वेगाडी आहे. टॉवरवर जाऊन सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी येथे शनिवार, रविवारी गर्दी होते. अन्य वारी सरासरी १५० ते २०० जण येऊन जातात. महिन्याला साधारण साडेपाच ते सहा हजार नागरिक भेट देतात. या उद्यानाची स्थिती चांगली असून येथे ओपन थिएटरसुद्धा आहे. येथे छोटे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. कंत्राटदार या बागेची काळजी घेतात. त्यामुळे येथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहायला मिळातो. गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे.

---

शिर्के उद्यानाकडे पालिका लक्ष देणार का?
१९६० मध्ये शिर्के उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानापन्न आहे. येथे शिवजयंतीचा कार्यक्रमही अनेक वर्षे करण्यात येत आहे. मुख्य मार्गाला लागून शासकीय विश्रामगृहाजवळील असणाऱ्या या बागेची देखभाल करण्याकडे पालिकेचे जास्त लक्ष असते. तेथे दोन खेळणी मोडलेली आहेत. घसरगुंडी व दुसऱ्या खेळण्यांजवळ पाणी साचत असल्याने मुले घसरून पडतात. याबाबत काही पालकांनी संबंधितांकडे तक्रार केली; परंतु अजून यावर मार्ग निघालेला नाही. या उद्यानात वाढलेली झाडे शोभा वाढवतात. बागेत झाडाच्याभोवती नारळाच्या झाडाचे ओंडके व वाया गेलेले टायर रंगवून लावून सजावट केली आहे. या बागेत मुलांची गर्दी असते.
---
फडके उद्यानाची दुरवस्था
बंदररोड येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानाची दुर्दशा झाली आहे. येथे कारंजा बंद आहे. बागेत अस्वच्छता असून झाडांचा पालापाचोळा पाहायला मिळाला. शहरातील हे खूप जुने उद्यान असून खेळणीही मोडलेली आहेत. बसायची बाकडी अस्वच्छ आहेत. कोणतीही हिरवळ येथे नाही.

---

तुटलेले साहित्य चोरीला जाण्याची शक्यता
लक्ष्मीचौक येथील उद्यानामध्ये खेळणी मोडकी, तुटलेली आहेत. या उद्यानात खराब लोखंडी सामान, खेळणी काढून ठेवलेली आहेत; परंतु भंगारवाले येथे चोरीच्या उद्देशाने फिरत असतात. त्यामुळे हे सामान चोरीला जाऊ शकते, अशी बागेत नेहमी फिरायला येणाऱ्या लोकांनी सांगितले. पालिकेने जनतेच्या करातून खर्च केलेले हे साहित्य चोरीला गेले तर काय उपयोग असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

----

कोट
रत्नागिरी शहरामध्ये एकूण लहान-मोठी ४० उद्याने आहेत. त्यात १५ मोठ्या उद्यानांचा समावेश आहे. नगरपालिकेच्या फंडातून उद्यानांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी दरमहा साधारण साडेतीन लाख रुपये खर्ची पडतात.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी.

कोट
बागांमध्ये नवनवीन खेळणी आणली पाहिजेत तसेच बागांचे नूतनीकरण करताना तेथे स्थानिक झाडे लावावीत. शहरात ज्याप्रमाणे ऐतिहासिक म्युरल्स बनवण्यात आली आहेत. तशी निसर्गसौंदर्य दाखवणारी म्युरल्स बागांमध्ये करता येऊ शकतात. बागांचे सुशोभिकरण करताना स्थानिक लोकांचे म्हणणे जाणून घ्यावे.
- सचिन करमरकर,