नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा नाभिक संघटनेची सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा 
नाभिक संघटनेची सभा उत्साहात
नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा नाभिक संघटनेची सभा उत्साहात

नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा नाभिक संघटनेची सभा उत्साहात

sakal_logo
By

89054
मालवण ः जगदिश चव्हाण यांचे अभिनंदन करताना जिल्हा नाभिक संघटनेचे पदाधिकारी विजय चव्हाण, राजन पवार, अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण आणि इतर.

नाभिक भवन संदर्भात सकारात्मक चर्चा

मालवणात संघटनेची सभा; जिल्हाध्यक्षपदी जगदिश चव्हाण

तळेरे, ता. १४ ः महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सिंधुदुर्ग शाखेची सभा मालवण येथील भैरवी मंदिरात झाली. जिल्हा नाभिक संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून तळगावचे जगदिश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांचा माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी सत्कार केला. जिल्हा नाभिक भवन संदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी राज्य प्रदेश सरचिटणीस राजन पवार, राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण, महेश परुळेकर, कणकवली महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल, कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, ज्येष्ठ नागरिक कारीवडेकर, वेतूरकर, निवृत्त शिक्षक बाळकृष्ण लाड, मालवण नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, जिल्हा प्रसिध्द प्रमुख गणेश चव्हाण, मालवण महिलाध्यक्षा दिपाली शिंदे, कुडाळ महिलाध्यक्षा विद्या चव्हाण, कणकवली महिला सचिव हेमांगी अणावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार, कणकवली तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण, कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर, निवृत्त शिक्षक व कणकवली नाभिक कर्मचारी तालुकाध्यक्ष दिगंबर चव्हाण, जिल्हा महिला सदस्या रचना चव्हाण, रुपेश पिंगुळकर, किशोर पिंगुळकर, किशोर लाड, दाजी माने, चंद्रकांत चव्हाण, विठोबा चव्हाण आदी उपस्थित होते. महेश परुळेकर यांनी नाभिक समाजाच्या विकासासाठी सर्व्हेक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ३१ मे पूर्वी जिल्ह्यातील सर्व्हेक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने तालुकाध्यक्ष यांनी तालुकावार सभा घेऊन माहिती देण्यासाठी ठराव घेण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. मागील झालेल्या खर्चास मंजुरी घेण्यात आली.
-----------
चौकट
महिला कार्यकारिणी स्थापन
नवीन महिला कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांची पुनर्निवड झाली. नवीन पदाधिकारी म्हणून उपाध्यक्षा अलिशा वेतुरकर, कार्याध्यक्षा विद्या चव्हाण, खजिनदार शिवानी चव्हाण, जिल्हा कार्यालयीन चिटणीस व सल्लागार विशाखा चव्हाण, रचना चव्हाण यांची निवड करण्यात आली. सर्व महिला तालुकाध्यक्षांचीही कार्यकारिणी सदस्या म्हणून निवड झाली.