
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करू नका
rat१४३५.txt
बातमी क्र.. ३५ (पान ५ साठी)
- rat१४p५०.jpg-
८९०५७
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देताना काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, रमेश शहा, वहिदा काझी, रफिक मुल्ला आदी.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करू नका
काँग्रेस अल्पसंख्याक विभाग ; रिक्त पदे २५ टक्क्यांवर जाणार
रत्नागिरी, ता. १४ ः ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील ७०७ शिक्षकांना अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा परिषद देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यासाठी शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शिक्षकांची ७ हजार २३२ पदे मंजूर असून त्यापैकी ११५० पदे रिक्त आहेत. ६१०० शिक्षक कार्यरत आहेत. १५ टक्केपेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असताना ७०७ शिक्षकांची बदली झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २५ टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होऊन गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हे आदेश देताना आरटीई कायद्याचे निकष महाराष्ट्र शासनाकडून धाब्यावर बसवण्यात आले आहेत. हा आदेश काढताना शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश शहा, वहिदा काझी, रफिक मुल्ला व अन्य उपस्थित होते. दरम्यान, ''सकाळ''ने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. शिक्षकांना परजिल्ह्यात जाण्यास सोडले तर शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट केले होते. हे वृत्त वाचल्यानंतर शेखासन यांनी तत्काळ बदल्या रद्द करा, असे निवेदन दिले.
---
कोट
आधी भरती करावी नंतर त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. कार्यमुक्तीचा आदेश रद्द करावा. तसे न केल्यास जिल्ह्यातील पालकांना घेऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
- हारिस शेकासन, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग