
वेंगुर्ले बार असोसिएशन अध्यक्षपदी प्रभुखानोलकर
swt1428.jpg
89060
सुषमा प्रभुखानोलकर, किरण पराडकर, प्रकाश बोवलेकर
वेंगुर्ले बार असोसिएशन
अध्यक्षपदी प्रभुखानोलकर
वेंगुर्लेः वेंगुर्ले तालुका बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी अॅड. सुषमा प्रभुखानोलकर, उपाध्यक्षपदी अॅड. किरण पराडकर, सचिवपदी अॅड. प्रकाश बोवलेकर, सहसचिव अॅड. मनीष सातार्डेकर, तर खजिनदारपदी अॅड. सागर ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली. वेंगुर्ले तालुका बार असोसिएशनची सभा मावळते अध्यक्ष अॅड. जी. जी. टांककर यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या सभागृहात झाली. कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. समीर मुणनकर व अॅड. हर्षदा राऊळ यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एन. जे. गोडकर, अॅड. सूर्यकांत प्रभुखानोलकर, अॅड. दिनकर वडर, अॅड. श्रीकृष्ण ओगले, अॅड. संदीप परब, अॅड. धनंजय झांट्ये, अॅड. तेजश्री कांबळी, अॅड. शुभांगी सडवेलकर, अॅड. पूनम नाईक, अॅड. श्वेता चमणकर, अॅड. सुधा केळजी, अॅड. आरती गावडे, अॅड. भावना पोखरे, अॅड. तेजश्री झांट्ये, अॅड. हर्षदा कुडव व अॅड. एकता धानजी आदी उपस्थित होते.
................
swt1429.jpg
89061
तळवडेः येथील विहिरीमध्ये आढळून आलेली मगर.
तळवडेत विहिरीत आढळली मगर
सावंतवाडीः तालुक्यातील तळवडे-काळेवाडी येथील नारायण काळे यांच्या माड बागायतीतील विहिरीमध्ये भली मोठी मगर आढळून आली. याबाबतची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सावंतवाडी वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक रमेश पाटील, वन कर्मचारी बबन रेडकर, वैशाली वाघमारे यांनी मगरीला सुरक्षितरित्या पकडले. यासाठी स्थानिक ग्रामस्थ रेडकर, धुरी, सपकाळ, मोर्य, बुगडे व दळवी यांनी मदत केली.
...............