
घोणसरी येथे साकव मंजूर
घोणसरी येथे साकव मंजूर
कणकवली ः घोणसरी खवळेभाटले (ता.कणकवली) ते स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर साकव बांधकाम मंजूर झाले आहे. यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. या बांधकामासाठी २६ लाख ५४ हजार ४३८ रुपये मंजूर केले आहेत. मजूर सहकारी संस्थांना १८ मार्च पर्यंत निविदा डाऊनलोड करून बंद लखोट्यामध्ये २० मार्च पर्यंत ई- निविदा करावी लागणार आहे. त्याच दिवशी निविदा खुली होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले आहे.
--
सोनाळी चव्हाणवाडीला साकव मंजूर
वैभववाडी ः सोनाळी (ता.वैभववाडी) ग्रामपंचायती अंतर्गत चव्हाणवाडी येथे साकव मंजूर करण्यात आला आहे. यासाठी २६ लाख ८३ हजार ४५ रुपयांचा निधी मंजूर आहे. मजूर सहकारी संस्थांसाठी ही ई- निविदा आहे. सहा महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याची मुदत असून मजूर संस्था अ किंवा ब त्यावरील संस्थांना ही ई- निविदा भरता येणार आहे. या निवेदीची मुदत २० मार्चपर्यंत असून त्या दिवशी ही निविदा खुली केली जाणार आहे.