उन्हाचा चटका; कामांवर मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाचा चटका;
कामांवर मर्यादा
उन्हाचा चटका; कामांवर मर्यादा

उन्हाचा चटका; कामांवर मर्यादा

sakal_logo
By

उन्हाचा चटका;
कामांवर मर्यादा
कनेडी,ता.१४ ः येथील परिसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस तापत आहे. उन्हाची तिरीप आणि उकाडा यामुळे शिवारातील शेतीच्या कामांवर मर्यादा आली आहे.
एकूणच उकाड्यामुळे माठ, शीतपेये, कलिंगड यांची मागणी वाढली आहे.
शेतकरी सध्या उन्हाळी शेतीच्या कामात आहेत. कुळीद, मुग, चवळी शेतीची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पहाटे आपल्या शेतात वावरावे लागत आहे. सकाळी अकरा वाजल्यानंतर घराबाहेर पडणे शक्य होत नाही. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शीतपेयांनाही मागणी वाढली आहे. रसवंतीगृहे फुलली आहेत. नाक्यानाक्यावर लिंबू सरबताचे स्टॉल लागल्याचे दिसते.
--
कसवण तळवडे
रस्ता धोकादायक
कळसुली,ता.१४ ः कसवण तळवडे हा रस्ता वाहुकीस धोकादायक आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली आहेत. त्यामुळे मोठ्या दोन वाहनाना एकाचवेळी रस्त्यावरून मार्ग काढणे अवघड आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी चालवण कठीण झाले आहे. कणकवली कसवण तळवडे मार्ग आंब्रड, ते घोटगे असा हा लाबंचा प्रवास असलेल्या रस्ता आहे. या रस्त्याची डागडूजी करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.