
प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योजिका दडलेली
rat१४३३.txt
- rat१४p४१.jpg-
८९०२१
रत्नागिरी ः सॅटर्डे क्लबतर्फे मृण्मयी साळवी यांचा सत्कार करताना जया सामंत पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात उद्योगलक्ष्मी पुरस्कार पारिजात कांबळे यांना प्रदान करताना उर्मिला घोसाळकर.
महिलांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनावे
जया सामंत; उद्योगलक्ष्मी पुरस्कार पारिजात कांबळेना
रत्नागिरी, ता. १४ ः प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योजिका दडलेली असते. त्यामुळे उद्योजक म्हणून यशस्वी होईलच; पण महिलांनी शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनले पाहिजे. सध्या धावपळीच्या युगात महिलांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. भाजीवाली, कामवाली अशा महिलांना अनेक समस्या भेडसावत असतात. त्यांनासुद्धा मदतीचा हात दिला तर समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल, असे प्रतिपादन जया सामंत यांनी केले.
सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येथील विवा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या उद्योगलक्ष्मी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी पहिला उद्योगलक्ष्मी पुरस्कार पारिजात कांबळे (गुहागर) यांना उद्योजिका उर्मिला घोसाळकर यांच्या हस्ते यांना देण्यात आला. त्या महिला बचतगटांच्या माध्यमातून रोजगार देत असून स्वतः तीन हॉटेल्स चालवतात. द्वितीय पुरस्कार मृणाली साळवी यांना ॲड जया सामंत यांच्या हस्ते प्रदान केला. साळवी यांनी मृणाल फॅशन वर्ल्ड अँड ब्युटी स्किल्सच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार मिळवून दिला असून ३५० पेक्षा अधिकजणींना प्रशिक्षण दिले आहे. श्रद्धा कळंबटे यांचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, माधुरी कळंबटे यांचा महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप् स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. उद्योजिका घोसाळकर म्हणाल्या, उद्योजक म्हणून आपले कर्तव्य महिलांनी जरूर पार पाडावे. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी; पण ती करताना कुटुंबाकडेही दुर्लक्ष करू नये. मुलांचे मित्र बनावे. या कार्यक्रमाला जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, बँक ऑफ इंडियाचे एमएसएमई विभागाचे प्रमुख कुमार प्रमोद सिंग उपस्थित होते. निवेदन विवेक तांबे यांनी तर शाखाध्यक्ष तुषार आग्रे, सचिव प्रतीक कळंबटे तर मानसी महागावकर यांनी क्लबविषयी माहिती दिली.