मालवणात शुक्रवारी पुरस्कार वितरण

मालवणात शुक्रवारी
पुरस्कार वितरण

मालवणात शुक्रवारी
पुरस्कार वितरण
मालवण : मालवण स्पोर्टस असोसिएशन व सकल भंडारी हितवर्धक संस्था यांच्यावतीने लिलाधर गणेश हडकर यांच्या तृतीय स्मृतीप्रित्यर्थ हडकर कुटुंबीयांच्या वतीने नंदिता पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वास स्मृतीलिला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १७) दुपारी ४ वाजता लीलांजली हॉल भरड येथे हा कार्यक्रम होणार आहे. यात उत्कृष्ट क्रिकेटपटू नरहरी चिंदरकर, बॅडमिंटनपटू महेश परब, हॉलीबॉलपटू विलास हरमळकर, उदयोन्मुख टेबल टेनिसपटू आर्या दिघे, उदयोन्मुख किक्रेटपटू मंदार माडये यांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये, भाई गोवेकर व प्रथम स्मृतीलिला पुरस्काराचे मानकरी भाई खराडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल भंडारी हितवर्धक संस्था अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com