खेड ः खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार
खेड ः खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

खेड ः खेडमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

sakal_logo
By

- rat14p58.jpg ःKOP23L89083
खे़ड ः खेड पंचायत समिती येथे आंदोलनाला बसलेले कर्मचारी.

खेडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार
खेड ः जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी समन्वय समितीतर्फे मंगळवार पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू करण्यात आले. या संपात खेडमधील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. शहरातील पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आंदोलकांकडून निदर्शने करण्यात आली. एनपीएस पद्धतीने सेवानिवृत्ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपात जवळपास सर्वच सरकारी व निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय व सर्व शासकीय कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलकांनी एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागणीमान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.