
दाभोळ ः दापोलीत कर्मचाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
- rat१४p६६.jpg ः KOP२३L८९१०० दापोली ः येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देताना कर्मचारी.
दापोलीत कर्मचाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
दाभोळ, ता. १४ ः जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी दापोली येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सरकारी कर्मचारी व शिक्षक, आरोग्य विभागाचे यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. जुनी पेन्शन योजनेसाठी दापोली तालुक्यातील शासकीय कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. दुपारी ११ वा. सर्व कर्मचारी दापोलीतील तहसील कार्यालयाच्या आवारात एकत्र जमले, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
वर्ग अ व ब मधील अधिकारी वगळता बहुतांश सर्व कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालयात आज नागरिक आलेच नाहीत. दापोली तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष जावेद शेख ( अध्यक्ष, शिक्षक समिती), उपाध्यक्ष स्वप्नील देसाई ( कोकण कृषी विद्यापीठ), सचिव विनोद पारधे ( महसूल सहाय्यक), सहसचिव विनोद जाधव (तलाठी संघटना), खजिनदार गणेश आईनकर (पंचायत समिती) , दापोली तालुका राज्य शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कराड, उपाध्यक्ष अमित शिगवण, कार्याध्यक्ष वैभव बापट, सचिव संकेत जालगावकर, सहसचिव वैभव पाटील, वैभव बारंगुळ या पदाधिकार्यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. संपात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व सभासद यांनी गुरूवारी १५ मार्चला सकाळी १० वा. तहसील कार्यालयात येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.