खवटीतील ग्रामस्थ शिवसेनेत

खवटीतील ग्रामस्थ शिवसेनेत

rat१४४६.txt


- rat१४p५४.jpg ः
८९०७५
खेड ः तालुक्यातील खवटी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे स्वागत करताना शिवसेना नेते रामदास कदम सोबत शिवसेना सचिव सिद्धेश कदम.

खवटीतील चार सदस्यांसह ग्रामस्थ शिवसेनेत

खेड ः तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीचे ४ सदस्य व शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सचिव सिद्धेश कदम, आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रेवश केला. या वेळी अरुण कदम, विशाल दळवी, संजय दळवी, मनोहर शेलार, शाम गवळी, एकनाथ दळवी, एकनाथ जाधव, मनोज देवळेकर, दामू झोरे, राम गवळी, बबन दळवी, संदीप पवार, प्रथमेश वाघे, सुनील गवळी, सीताराम पवार, विठ्ठल जाधव, राजेश दळवी, गजानन वाघे, दत्ताराम वाघे, लक्ष्मण दळवी, महेश दळवी, सुयेश दळवी, प्रवीण दळवी, संदीप पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी साक्षी दळवी, मानसी पाटील, सुरेखा बुरटे व गणेश देवळेकर या चार सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर यापूर्वी शिवसेनेकडे शाम गवळी, भिकाजी शिंदे व विशाखा चव्हाण हे सदस्य निवडून आले होते. आता खवटी ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य संख्येत शिवसेनेकडे ७ सदस्य आहेत. खवटी गावचा सर्वांगीण विकास हाच आमदार म्हणून माझा ध्यास असेल असे सांगताना संपूर्ण दापोली मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे परमकर्तव्य असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

--
फोटो
- rat१४p५६.jpg ः
८९०७७
खेड ः चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर गर्दी.

परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची रेल्वेला पसंती

खेड ः शिमगोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेहमीच्या गर्दीमुळे कोकण रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची जागा मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. नियमित व हॉलिडे स्पेशल गाड्यांना प्रचंड गर्दी उसळली असून खेड रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्‍या चाकरमान्यांना रेल्वेत पाय ठेवायला जागा मिळत नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. ज्या प्रवाशांनी आरक्षण केले त्यांनादेखील डब्यात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोकणात शिमग्याला गावी येण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी अनेक कुटुंबांनी आरक्षण गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी करूनसुद्धा लोकांना गर्दीमुळे आरक्षित डब्यामध्ये प्रवेश मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे खेड रेल्वेस्थानकात दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही गर्दीची स्थिती रेल्वेस्थानकात दिसण्याची शक्यता आहे.

--
ओळी
- rat१४p६०.jpg ः
८९०८५
साडवली ः देवरूख तायक्वाँदो खेळाडूंना शुभेच्छा देताना डॉ. सुभाष बने

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंची निवड

साडवली ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रत्नागिरी व जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सबज्युनियर अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा १६ ते १८ मार्च दरम्यान एसवीजेसीटी स्पोर्ट्स अॅकॅडमी सावर्डे (चिपळूण) या ठिकाणी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीअंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब, निवे तायक्वांदो क्लब, पी. एस. बने तायक्वांदो क्लबचे खेळाडू साहिल जागुष्टे, अधिराज कदम, आयुष वाजे, श्रावणी इप्ते, सान्वी रसाळ, स्वराली शिंदे, दुर्वा जाधव हे सात खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी अॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने व बारक्याशेठ बने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, स्मिता लाड, शशांक घडशी, ॲड. पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे, रूपाली कदम, श्रीकांत यादव, पंकज मेस्त्री, प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com