विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

rat१४१५.txt


विजेचा धक्क्यात प्रौढाचा मृत्यू

आबलोलीतील घटना ः स्टीलची जाळी बनवतानाची घटना

गुहागर, ता. १४ ः हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा वीजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. रवी राठोड (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे राहणारा आहे. ही घटना सोमवारी (ता. १३ मार्च) सकाळी घडली.
याबाबत गुहागर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापुरात राहणारे रवी रामू राठोड आणि स्वप्नील देसू राठोड हे दोघे सध्या आपल्या काही सहकाऱ्यांसह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे काम करत आहेत. रवी आणि स्वप्नील सोमवारी (ता. १३ मार्च) सकाळी आबलोली पेट्रोलपंपाजवळील गटारावर काँक्रिटचा स्लॅब ओतण्यासाठी स्टीलची जाळी बनवण्याचे काम करत होते. जाळी बनवण्यासाठी लोखंडी सळ्यात योग्य मापात तोडण्याचे काम सुरू होते. या वेळी रवी यांच्या हातातील सळी गटाराजवळून गेलेल्या वीजवाहिनीतील तारेला चिकटली. विद्युतप्रवाह सुरू असल्याने सळी तारेला चिकटताच रवी राठोडला वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. लगलीच स्वप्नील राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रवी राठोडला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती स्वप्नील देसू राठोड यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दिली असून, अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतर रवी राठोड यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com