
विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू
rat१४१५.txt
विजेचा धक्क्यात प्रौढाचा मृत्यू
आबलोलीतील घटना ः स्टीलची जाळी बनवतानाची घटना
गुहागर, ता. १४ ः हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा वीजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. रवी राठोड (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे राहणारा आहे. ही घटना सोमवारी (ता. १३ मार्च) सकाळी घडली.
याबाबत गुहागर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापुरात राहणारे रवी रामू राठोड आणि स्वप्नील देसू राठोड हे दोघे सध्या आपल्या काही सहकाऱ्यांसह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे काम करत आहेत. रवी आणि स्वप्नील सोमवारी (ता. १३ मार्च) सकाळी आबलोली पेट्रोलपंपाजवळील गटारावर काँक्रिटचा स्लॅब ओतण्यासाठी स्टीलची जाळी बनवण्याचे काम करत होते. जाळी बनवण्यासाठी लोखंडी सळ्यात योग्य मापात तोडण्याचे काम सुरू होते. या वेळी रवी यांच्या हातातील सळी गटाराजवळून गेलेल्या वीजवाहिनीतील तारेला चिकटली.