
जयराम देशपांडेना अटक
rat1438.txt
बातमी क्र..38 ( पान 3)
फोटो : rat14p49.jpg ः
89043
जयराम देशपांडे
साई रिसॉर्टप्रकरणी अधिकारी देशपांडेना अटक
दाभोळ, ता. 14 ः दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्टप्रकरणी दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. जानेवारीत देशपांडे यांना राज्य सरकारने निलंबित केले होते. त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट बांधकामासंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर आरोप केले होते; मात्र परब यांनी ते फेटाळले होते. या रिसॉर्टचे मालक उद्योजक सदानंद कदम यांना नुकतेच ईडीने या प्रकरणासंदर्भात अटकही केली आहे. त्यानंतर देशपांडेंवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. साई रिसॉर्टला बेकायदेशीर पद्धतीने ना-विकासक्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिल्याच्या प्रकरणात राज्य शासनाने दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना 23 जानेवारीच्या आदेशाने निलंबित केले होते. निलंबनापूर्वी देशपांडे हे रायगड जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी (रोहयो) पदावर कार्यरत होते.
-