नारिंगी नदीत मगरीचा मृत्यू

नारिंगी नदीत मगरीचा मृत्यू

rat१४६०.txt

- rat१४p७२.jpg-
८९१२१
खेड ः नारिंगी नदीपात्रातील मृत मगर.

नारिंगी नदीत मगरीचा मृत्यू

खेड, ता. १४ ः येथील नारिंगी नदीपात्रानजीकच्या सुसेरी क्र. २ मध्ये आज (ता.१४) एक मगर मृतावस्थेत आढळून आली. वारंवार मृत्युमुखी पडणाऱ्या मगरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जगबुडी नदीत आतापर्यंत ६ मगरींचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले आहे. नदीला पडलेल्या प्रदुषणामुळे एकापाठोपाठ मगरी मृत होऊ लागल्या असल्याने एकप्रकारे धोक्याची घंटा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी जगबुडी पुलानजीक भोस्ते ते खेडदरम्यान सुसेरी या ठिकाणी नदीच्या पात्रात मृत मगरी विविध ठिकाणी तरंगताना आढळल्या. या संदर्भात अनेक पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती तर जगबुडी नदी प्रदूषित झाल्यामुळे मगरींच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com