क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

rat१४४४.txt

अल्पवयीन मुलीचे अपहरण

रत्नागिरी ः तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० मार्चला पहाटे घडला. याबाबत तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
---
आग विझवताना शेतकऱ्याचा मृत्यू

दाभोळ ः दापोली तालुक्यातील लाडघर येथील एका शेतकऱ्याचा शेतातील आग विझवताना मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. काल सायंकाळी उशिरा ग्रामस्थांच्या लक्षात ही गोष्ट आली तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडघर शंकरवाडी येथील अनिल दत्तात्रय झगडे (वय ५५) हे काल (ता.१३) सकाळी १० च्या सुमारास शेतात साफसफाई करण्यासाठी जातो म्हणून गेले होते. शेतात साफसफाई करत असताना त्यांना शेतात आग लागलेली दिसली. शेताजवळ असलेल्या गवताने पेट घेतला होता. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वातावरणातही उष्मा होता. ही आग विझवत असताना त्यात ते होरपळले गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी शेतावर गेले असता ते शेताच्या बांधाजवळ पडलेले आढळून आले. त्यांच्या अंगावरील कपडे जळून ते अंगाला चिकटले होते. या संदर्भात दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अजित गुजर करत आहेत.

--
आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

दाभोळ ः दापोली तालुक्यातील जालगाव सुतारकोंड येथील एका ७० वर्षीय वृद्धाने आजारपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव सुतारकोंड येथील सुरेश रामचंद्र ठोंबरे हे किडनीच्या आजाराला कांटाळले होते. आज दुपारी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत ते दिसले. याची खबर दापोली पोलिस ठाण्यात देण्यात आली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करत आहेत.

--
मारहाणप्रकरणी १३ संशयितांविरोधात तक्रार
दाभोळ ः दापोली तालुक्यातील इनामपांगारी सुतारवाडी येथे मारहाण केल्याप्रकरणी १३ संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, इनामपांगारी येथील मनिषा देवघरकर व त्यांचे पती असे सोमवारी (ता. १३) सायंकाळी खेड येथून किराणा सामान घेऊन इनामपांगारी सुतारवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ आले असता त्यांना काठीने व हाताच्या थापटाने मारहाण करण्यात आली. तसेच घरी येऊन त्यांचा मुलगा व आई यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विलास देवघरकर, विजया देवघरकर, प्रथमेश देवघरकर, परशुराम देवघरकर, संतोष देवघरकर, विकास निवळकर, सुचिता देवघरकर, चंद्रकांत देवघरकर, सुजाता देवघरकर, वनिता निवळकर, प्रगती देवघरकर, वैभव देवघरकर यांच्याविरोधात मनिषा देवघरकर यांनी तक्रार दाखल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत.
----