ःओवळीतही दिवसभर वनविभागाची कारवाई

ःओवळीतही दिवसभर वनविभागाची कारवाई

rat१४४७.txt

बातमी क्र..४७ (पान ३ साठी)

फोटो ओळी
- ratchl१४२.jpg ः
८९०७०
चिपळूण ः लाकूडतोडीसाठी जंगलभागात तयार केलेले खासगी रस्ते.
- ratchl१४३.jpg ः र
८९०७१
स्त्याच्या कडेला असे जागोजागी लाकूडसाठा आढळून येतो.
- ratchl१४४.jpg ः
८९०७२
रस्त्याच्या बाजूलाच असा लांबलचक ठेवण्यात आलेला लाकूडसाठा.

ओवळीतही दिवसभर वनविभागाची कारवाई

अधिकारी नॉट रिचेबल ; डोंगरभागात रस्ते करून जंगलतोड

चिपळूण, ता. १४ ः तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यात नांदिवसे गणेशपूर जंगलात येथे बेसुमार वृक्षतोड होत असल्याची घटना सोमवारी निदर्शनास आली. त्या पाठोपाठ ओवळी येथे डोंगरभागात रस्ते तयार करून तेथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याचे पुढे आले आहे. येथील लाकूडतोडीबाबत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी सायंकाळीच पोहोचले. मंगळवारी याबाबतची कार्यवाही सुरू होती. मंगळवारी दिवसभर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

येथील जंगलतोडीची माहिती कोणी दिली, आमची तक्रार कोणी केली यावरून तिथे हंगामा सुरू होता. सोमवारी ( ता.१३) सायंकाळी अधिकाऱ्यांनी लाकूडसाठ्याचे फोटो सबंधीतास दाखवून ते त्यांचेच आहेत की नाही, याची खात्री केली. सायंकाळी उशीर झाल्याने लाकूडसाठ्याच्या ठिकाणी सबंधिताना जाता आले नव्हते. या परिसरात जंगलतोडीसाठी मुख्य डांबरी रस्त्यापासून ३ ते ४ किमीच्या कच्च्या स्वरूपाचे रस्ते जंगल व डोंगरभागात तयार करण्यात आले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने डोंगरकटाई करत हे रस्ते केले आहेत. या रस्त्याच्या कडेलाच मोठ्या प्रमाणात जळावू लाकडाचे साठे आहेत. प्रत्यक्षात येथे बेसुमार आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीस वनविभागाकडून परवानगी घेतली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी वनविभागातील अधिकाऱ्यांकडून ओवळी येथील कारवाईसंदर्भात पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सह्याद्रीच्या खोऱ्यात होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीबाबत जागरूक ग्रामस्थांमधून सातत्याने आवाज उठवला जात असला तरी लाकूड व्यापाऱ्यांकडून ही जंगलतोड थांबताना दिसत नाही. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सह्याद्री खोऱ्यातील जंगल बोडके होताना दिसत आहे. पावसाळ्यात तर सह्याद्री खोऱ्यातील डोंगरांना भेगा पडल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत.
..
कुऱ्हाडबंदीचा ठराव आवश्यक
बेसुमार होणारी जंगलतोड रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदीचा ठराव घेण्याची आवश्यकता आहे. मुळात सह्याद्रीच्या खोऱ्यात दरडी कोसळणे आणि डोंगरास भेगा पडण्याचे प्रकार पावसाळ्यात घडले. त्यावरील उपाययोजना बाकी असतानाही जंगलतोड थांबलेली नाही याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिंदे यानी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com