
चिपळूण ः चिपळूण पालिकेच्या सानुग्रह अनुदान वाटपात घोळ
चिपळूण पालिकेच्या सानुग्रह अनुदान वाटपात घोळ
चिपळूण, ता. १५ ः चिपळूण पालिकेच्या २०१६-१७ ते १९१९-२०२० या आर्थिक वर्षात झालेल्या सानुग्रह अनुदान वाटपात अनियमितता व घोळ झाल्याचा आक्षेप लेखापरीक्षण अहवालात नमूद केला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी दिली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन बेकायदेशीररित्या वितरित झालेल्या ७० हजार रुपयांची वसुली करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.
मुकादम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चिपळूण नगर पालिकेकडून दिवाळी सणानिमित्त तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ठरावानुसार सानुग्रह अनुदान दिले जाते. १५ ते २० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. याच्या वाटपात शासनाचे नियम व निर्देशांचे पालन केले जात नाही. २०१६-१७ ते १९१९-२०२० या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालाचे अवलोकन केले आहे. त्यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी पंकज पवार/पाटील यांच्या कारकिर्दीत राज्य सरकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.