गुहागर ः  नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभूल

गुहागर ः नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभूल

rat१४p६४.jpg ःKOP२३L८९०९८
गुहागर ः शहर विकास आराखड्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेताना गुहागर तालुक्यातील पदाधिकारी.

मंजुरी नसलेला महामार्ग आराखड्यात कसा?
किरण खरे ; नगररचनाकारांकडून गुहागरवासीयांची दिशाभूल
गुहागर, ता. १४ ः रस्ते विकास महामंडळाची परवानगी न घेता आरेखनात मंजूर नसलेला महामार्ग विकास आराखड्यात दाखवण्यात आला आहे. नगररचनाकारांनी गुहागरवासीयांची दिशाभूल केली आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी केला.
मंगळवारी (ता. १४) मार्च शहरविकास आराखड्यासंदर्भात अधिकारी, मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटी घेण्यासाठी गुहागरमधील भाजपचे पदाधिकारी मुंबईत गेले होते. त्या वेळी दूरध्वनीवरून किरण खरे यांनी ही माहिती दिली.
गुहागर शहर विकास आराखड्यात ३० मीटर रूंदीचा महामार्ग दाखवण्यात आला आहे. या महामार्गामुळे वरचापाटतर्फे गुहागर या महसुली गावाचे विभाजन होत आहे. दोन घरांसह अनेकांची शेती धोक्यात येत आहे. त्यामुळे किरण खरे यांनी नगरपंचायत, सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून माहिती घेतली. त्या वेळी महामार्गाचे ३ आरेखन नकाशे तयार केले होते. एक नकाशा विकास आराखड्यात टाकण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती नगररचनाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
खरे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाने अजुनपर्यंत महामार्गाचे कोणतेच आरेखन निश्चित केलेले नाही. गुहागरच्या विकास आराखड्यात कोणता महामार्ग दाखवावा या संदर्भात नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरीबरोबर कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही अशी माहिती दिली. ही माहिती मिळताच किरण खरे यांनी गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांना फोन केला. शहर विकास आराखड्यात महामार्ग कसा दाखवण्यात आला, अशी विचारणा केली. त्यावर शिंगटे यांनी माहिती घ्यावी लागेल.


जनतेची केलेली फसवणूक
किरण खरे म्हणाले, ‘गुहागरचा विकास आराखडा बनवणाऱ्यांनी जाणीवपूर्वक, गुहागरकरांची दिशाभूल करण्यासाठी महामार्गाचे आरक्षण टाकले आहे. अधिकाऱ्यांनी जनतेची केलेली फसवणूक आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे हे उघड झाले. आता रत्नागिरी नगररचनाकार विभागाने असे का केले याचा खुलासा करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com