कसाल येथील मोबाईल व्यावसायिकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसाल येथील मोबाईल 
व्यावसायिकाचा खून
कसाल येथील मोबाईल व्यावसायिकाचा खून

कसाल येथील मोबाईल व्यावसायिकाचा खून

sakal_logo
By

89161
सचिन भोसले

कसाल येथील मोबाईल
व्यावसायिकाचा खून

मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात

ओरोस, ता. १४ ः कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय ४१) यांचा खून झाल्याचे पुढे आले आहे. आज कसाल बालमवाडी येथील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या कान व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय होता. सायंकाळी उशिरा जिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सचिन यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले; मात्र, खुनी कोण हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
कसाल बाजारपेठेत कसाल पोलिस दूरक्षेत्राच्या बाजूला गेले कित्येक वर्षे सचिन यांचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. मोबाईल मधील असलेली जाण आणि सतत हसतमुख, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा आदर ठेवून ते संवाद साधत असल्याने त्यांचा व्यवसायही चांगल्या स्थितीमध्ये सुरू होता. मात्र मंगळवारी सकाळी ते राहत असलेल्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ उडाली होती. सचिन हे अविवाहित होते. ते आपल्या घरात एकटेच राहत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. तसेच व्यवसायामुळे उशिरापर्यंत त्यांना दुकानात थांबावे लागत होते. यामुळे वृद्ध वडिलांची काळजी घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे वडील त्यांच्या बहिणीकडे राहत होते. तर या घरात एका खोलीमध्ये सचिन स्वतः आणि दुसऱ्या खोलीमध्ये त्यांचा भाऊ असे वेगवेगळे राहत असत.
सचिन रविवारी सायंकाळी दिसले होते; मात्र सोमवारी सकाळपासून त्यांच घर बंद होतं. तर त्यांची दुचाकी अंगणात उभी होती. सोमवार असला की सचिन कधीकधी खरेदीसाठी कोल्हापूर किंवा अन्य शहरात जात असत. त्यामुळे ते कोल्हापूरला खरेदीला गेले असेल असे शेजाऱ्यांना वाटले होते. तर कधीतरी सचिन मूळ गाव असलेल्या मालवण राजकोट येथे सोमवारचा घरी दिवा लावण्यासाठी जात असत; मात्र या सोमवारी ते तिथे गेले नाहीत. तर आज मंगळवारी सकाळीही त्यांच घर बंदच दिसले. त्यामुळे शेजारील एकाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी खिडकीतून वाकून पाहिले असता सचिन रक्ताच्या थारोळ्यात उलटे झोपलेले आढळले. त्यामुळे शेजाऱ्यांनी ओरोस येथे राहत असलेले सचिनचे भावोजी यांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दुसरा भाऊ राहत असलेल्या खोलीतून सचिनच्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरवाजाने आत जाऊन पाहिले असता सचिन मृत झालेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सचिनच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती; परंतु त्यांच्या कान आणि नाकारून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला होता. रात्री उशिरा याचा अहवाल प्राप्त झाला. सचिन यांचा खून झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
--
चौकट
एक संशयित ताब्यात
सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयंत वारा, विवेक नागरगोजे, श्री.गोसावी, पोलिस नाईक अश्विनी भोसले, होमगार्ड रामदास तावडे आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले आहे.