आंबोलीत आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोलीत आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद
आंबोलीत आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद

आंबोलीत आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद

sakal_logo
By

89207
आंबोली ः आरोग्य मेळाव्यात मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी.

आंबोलीत आरोग्य मेळाव्यास प्रतिसाद
आंबोली : येथील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन सरपंच सावित्री पालेकर व मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत, डॉ. दीपक लादे, डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. जगदीश पाटील, डॉ. अमोल जेवरे, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, डॉ. आदिती पाटकर, सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, काशिराम राऊत, सर्व स्टाफ आणि आशा स्वयंसेविका तसेच शिबिराचे लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. नवांगुळ यांनी आरोग्य, स्वास्थ आणि तपासणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉक्टरांनी शिबिरार्थींची तपासणी केली. जिल्हा परिषद फंडमधून हा मेळावा घेण्यात आला.
...............
दोडामार्गला विविध कार्यक्रमांचे आयोजन
दोडामार्ग ः शहरातील दादा साई मंदिर मठात २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त मंदिरात २९ ला दुर्गाष्टमीचा कार्यक्रम, ३० ला श्री रामनवमी उत्सव व पालखी उत्सव, तर ४ ला कालोत्सव होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती दादासाई यांनी केले आहे.