माजी खासदार नीलेश राणेंच्या वाढदिनानिमित्त उद्या कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खासदार नीलेश राणेंच्या
वाढदिनानिमित्त उद्या कार्यक्रम
माजी खासदार नीलेश राणेंच्या वाढदिनानिमित्त उद्या कार्यक्रम

माजी खासदार नीलेश राणेंच्या वाढदिनानिमित्त उद्या कार्यक्रम

sakal_logo
By

89208
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना विशाल परब. शेजारी अशोक सावंत, दादा साईल, विनायक राणे, दीपक नारकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

माजी खासदार नीलेश राणेंच्या
वाढदिनानिमित्त उद्या कार्यक्रम

विशाल परब; मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ, ता. १५ ः माजी खासदार नीलेश राणे यांचा वाढदिवस मंत्री महोदयांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १७) विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली. पहिल्या दिवशीच्या नाट्यप्रयोगासाठी तब्बल ४० हजारांवर शिवप्रेमी व नीलेश राणे प्रेमी उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.
परब यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी विशाल फाउंडेशनचे दादा साईल, अशोक सावंत, विनायक राणे, दीपक नारकर, राकेश कांदे उपस्थित होते. परब म्हणाले, ‘‘नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आशिया खंडातील भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत ‘शिवगर्जना’, हे नाटक आयोजित केले आहे. या नाटकाची जय्यत तयारी सुरू आहे. या नाट्यप्रयोगासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी (ता. १७) नीलेश राणेंचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होईल. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राणे, अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री सावंत तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, प्रमोद जठार आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सर्व जबाबदारी फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी घेत आहेत. हा नाट्यप्रयोग शिवप्रेमी तसेच नीलेश राणे प्रेमींना चांगल्या पद्धतीने पाहता यावा, यासाठी नियोजनबद्ध बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. बाल्कनीची व्यवस्थाही असणार आहे.’’