कट्टा येथे पाककला स्पर्धेत
ढोलम यांची पाककृती प्रथम

कट्टा येथे पाककला स्पर्धेत ढोलम यांची पाककृती प्रथम

89211
कट्टा ः पाककला स्पर्धेतील विजेत्यांना नितीन वाळके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


कट्टा येथे पाककला स्पर्धेत
ढोलम यांची पाककृती प्रथम
ओरोस, ता. १५ ः कट्टा (ता. मालवण) येथील बॅ. नाथ पै सेवांगण शाखेच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मूगडाळ या कडधान्यावर आधारीत या स्पर्धेत कट्टा परिसरातील ३३ महिला सहभागी झाल्या. संध्या ढोलम यांनी सादर केलेल्या खरवस पाककृतीने प्रथम क्रमांक मिळविला.
ही स्पर्धा नाथ पै सेवांगण कट्टा शाखा कार्यालयात झाली. अॅड. समृद्धी म्हाडगुत, सायली चव्हाण, नितीन वाळके, हरेश चव्हाण, बापू तळावडेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, वैष्णवी लाड, बाळकृष्ण नांदोसकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाला. स्पर्धेमध्ये पुरणपोळी, भजी, वडे, खरवस, अप्पे, हलवा, इडली, वडा, लाडू, ढोकळा, खाजे, कचोरी इत्यादी विविध पाककृती सुबकतेने सजावट करून मांडण्यात आल्या. याचे परीक्षण मधुरा माडये, आरती कांबळी व प्रियांका भोगटे यांनी केले. यात प्रथम संध्या ढोलम (खरवस). द्वितीय अर्चना धुत्रे (पकोडा) आणि सोनाली मोरजकर (पुरणपोळी), तृतीय क्रमांक दीक्षा रेवडेकर (अप्पे), विजयश्री गावडे (हलवा), तर वेदा ताम्हणकर (इडली), पायल देऊलकर (लाडू), शुभदा वेंगुर्लेकर (कचोरी), स्वाती पुटवाड, सुविधा मलये, विदुला ताम्हणकर, हर्षदा चव्हाण यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. उत्तेजनार्थ सायली बोडये, दिलिशा गुराम यांनी मिळविला. या विजेत्या स्पर्धकांसह अनुश्री आळवे, राजश्री सावंत, नूतन मोरजकर, सुप्रिया ढोलम, स्वाती पोखरणकर, विजया वराडकर, प्रीती महाभोज, प्रियांका वाईरकर, मधुरा मोरजकर, दक्षता पाडावे, सुप्रिया गुराम, लिना शिंदे, तन्वी वराडकर, निव्या कुणकवळेकर, उज्ज्वला गुराम, सानिका गावडे, प्राची गावडे, श्वेता गावडे या स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुजाता पावसकर व शिवण क्लासच्या मुलींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com