
कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा संपास पाठिंबा
89228
कुडाळ ः नगरपंचायतीचे नगरपंचायत कार्यालय बाहेर निदर्शने करताना कर्मचारी.
कुडाळ नगरपंचायतीच्या
कर्मचाऱ्यांचा संपास पाठिंबा
कुडाळ ः ‘पेन्शन मिळालीच पाहिजे’, अशा घोषणा देत कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दिला. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, लेखापाल स्वप्नील पाटील, नगर अभियंता विशाल होडावडेकर, कर निरीक्षक कोरगावकर, सौ. आळवे, श्री. आजगावकर, श्री. म्हाडेश्वर, संजय हेरेकर आदी उपस्थित होते.
................
89227
अशोक दळवी
सावंतवाडी तालुक्यासाठी ३० कोटी
सावंतवाडी ः शिंदे-भाजप युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी १२ कोटी रुपये, तर राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी २९ कोटी ६० लाख तसेच प्रादेशिक पर्यटनासाठी रुपये १ कोटी निधी उपलब्ध करून मंजुरी दिल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी सांगितले. खाडीलगत धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी बांदा-शेर्ले खाडीलगत बंधारा बांधणे (२ कोटी), शेर्ले खाडीलगत धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे (१ कोटी ३२ लाख), आरोंदा खारभूमी क्र. २ (थोरले खाजण) येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे (२ कोटी), सातार्डा खाडी किनारी जेटी बांधणे (१ कोटी ५० लाख), आरोंदा खाडी किनारी जेटी बांधणे (१ कोटी), शेर्ले येथे संरक्षण भिंत बांधणे (१ कोटी) अशी भरीव निधीची तरतूद केली आहे.