सांस्कृतिक कार्यक्रमांनी कलेला व्यासपीठ

सांस्कृतिक कार्यक्रमांनी कलेला व्यासपीठ

89210
सिंधुदुर्गनगरी ः प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडीचा महिला मेळाव्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, महिला जिल्हाध्यक्षा शीतल परुळेकर आदी.


सांस्कृतिक कार्यक्रमांनी कलेला व्यासपीठ

ओरोसमधील महिला मेळावा; शिक्षक भारतीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः जागतिक महिला दिनानिमित्त प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवण तर्फे ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा शीतल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात झाला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि फातिमाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.
सिंधुदुर्ग महिला आघाडी सचिव वैशाली मिसाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या मावळत्या अध्यक्षा आशा गुणिजन यांनी संघटनेला २५ हजारांची देणगी दिली. त्यांचा व विजया डगरे यांचा निवृत्तीपर सत्कार करण्यात आला. शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी आपल्या भाषणातून जुनी पेन्शन, महिलांचे प्रश्न, संघटनेची दिशा व धोरणे याबाबत मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष दया नाईक यांनी प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गकडून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपोषणाचा इशारा दिला. श्रीम. परुळेकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षक भारतीने यशस्वी केलेल्या ‘आंतरजिल्हा बदली समावेश’ या संदर्भात संघटनेचे योगदान अधोरेखित केले.
बक्षीस समारंभामध्ये प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू देण्यात आली. प्रेक्षकांमधून आठ जणांना लकी ड्रॉ देण्यात आला. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष विनेश जाधव, महेश कदम, विठ्ठल शिंदे, पांडुरंग थेटे, मधुकर बाचिफळे, तुकाराम खिल्लारे, दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रीकर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाताडे, राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हा महिला आघाडी सचिव वैशाली गर्कळ, कुडाळ महिला आघाडी अध्यक्षा प्रीती सावंत, दोडामार्ग अध्यक्षा शरयू पाटील, कणकवली प्रतिनिधी रुपाली जाधव, मालवण अध्यक्ष संतोष कोचरेकर, सचिव संतोष परब, जिल्हा प्रतिनिधी लीनाणकर, जयश्री दोडके आदी उपस्थित होते. दीपक ठाकरे व महेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. महिला आघाडी अध्यक्षा परुळेकर यांनी आभार मानले.
--
नृत्यासह इतर कार्यक्रम
जिल्हाध्यक्षा गुणिजन यांनी संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रीती सावंत, रुपाली जाधव व शरयू पाटील यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले. महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी बहारदार नृत्ये सादर केली. स्मिता गावडे, लीना भंडलकर, स्नेहल बेलसरे यांनी लक्षवेधी नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. दोडामार्ग टीमने सादर केलेल्या सामूहिक नृत्याने सर्वांची मने जिंकली. टीम आंबेरी, कणकवली टीम, कुडाळ टीमने देखील बहारदार नृत्ये सादर केली. सरिता नाईक व केळुसकर यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com