प्रा. भोसले, अॅड. नेवगींना आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. भोसले, अॅड. नेवगींना आदरांजली
प्रा. भोसले, अॅड. नेवगींना आदरांजली

प्रा. भोसले, अॅड. नेवगींना आदरांजली

sakal_logo
By

89230
सावंतवाडी ः प्रा. मिलिंद भोसले, अॅड. दीपक नेवगींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

प्रा. भोसले, अॅड. नेवगींना आदरांजली
सावंतवाडी, ता. १५ ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले तळीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मिलिंद भोसले यांच्या ५ व्या स्मृतिदिनी अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तर कायदेतज्ज्ञ अॅड. दीपक नेवगी यांच्या प्रथम स्मृतिदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली‌.
यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळा सुटल्यानंतर देखील शाळेच्या मैदानात ज्यांचे पाय घुटमळतात, त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो, असा शिक्षक भोसले यांच्या रुपाने मी पाहिला. विद्यार्थी घडविणारे हे शिल्पकार शरीराने नसले तरी विचारांच्या रुपाने आजही आपल्यासोबत आहेत, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांनी केले. प्रास्ताविकात कोमसाप अध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी प्रा. भोसले व अॅड. नेवगी यांच्या स्मृती जागवत आदरांजली अर्पण केली. कोमसाप सावंतवाडी शाखेला सुरुवातीच्या काळात बळ देण्यात या दोन्ही व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अॅड. नीता कविटकर, कवी विठ्ठल कदम, प्रा. चंद्रशेखर धुरी, प्रा. रुपेश पाटील, प्रा. संजय कात्रे, अॅड. नकुल पार्सेकर, प्रा‌. गिरिधर परांजपे, अभिमन्यू लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली. प्रा. भोसले, अॅड. नेवगी यांचे विधी क्षेत्रात मार्गदर्शन लाभल्याचे सांगून आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप सदस्य विनायक गांवस, तर आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले. यावेळी प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, अॅड. नकुल पार्सेकर, डॉ. दीपक तुपकर, दीपक पटेकर, अॅड. नीता कविटकर, मानसी भोसले, हेमंत खानोलकर, प्रतिभा चव्हाण, प्रा. रुपेश पाटील, प्रा. चंद्रशेखर धुरी, हर्षा खानोलकर, अन्विता सावंत, नीलेश मेस्त्री, पल्लवी ढोरे, मकरंद मेस्त्री आदी उपस्थित होते.