
भडगाव बुद्रुक पुलाची नीलेश राणेंकडून पाहणी
८८९६६
भडगाव बुद्रुक ः वाणीवाडी (पांग्रड पूल) पुलाची नीलेश राणेंनी पाहणी केली.
भडगाव बुद्रुक पुलाची
नीलेश राणेंकडून पाहणी
कुडाळ ः पणदूर-घोटगे मुख्य रस्त्यावरील भडगाव बुद्रुक येथे पीठढवळ नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या जागी नवीन पूल मंजूर झाला असून भाजप नेते नीलेश राणे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पणदूर-घोटगे मार्गावरील सर्वात महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने पुरात वारंवार पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत होती. संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचीही शक्यता होती. या पुलासाठी भाजप नेते नीलेश राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. नवीन शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या पुलासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे विशेष लक्ष देत काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याना सूचना दिल्या. नीलेश राणे यांनी पाहणी केल्यानंतर बांधकामचे कनिष्ठ अभियंता श्री. गिरी व अन्य अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. यावेळी तातडीने काम सुरू करणार असल्याची माहिती दिली. भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, आनंद शिरवलकर, पप्या तवटे, किरण लोट, अमरनाथ लोट, विवेक कदम, विघ्नेश घाडी, संकेत सावंत, संतोष राणे, अभय सावंत, गौरव गुरव आदी उपस्थित होते.