जिल्ह्यातील 83 हजार 471 ग्राहकांनी थकवली वीजबिले

जिल्ह्यातील 83 हजार 471 ग्राहकांनी थकवली वीजबिले

महावितरणपुढे थकबाकीचा डोंगर
जिल्ह्यातील ८३ हजार ४७१ ग्राहकांची वीजबिले थकीत; वसुलीसाठी कठोर कारवाई
रत्नागिरी, ता. १५ः महावितरण कंपनीपुढील थकबाकी वसुलीचे संकट काही कमी होताना दिसत नाही. आर्थिक वर्ष संपण्याची घाई सुरू असताना महावितरण कंपनीला वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत. जिल्ह्यातील ८३ हजार ४७१ ग्राहकांनी महावितरणपुढे थकबाकीचा डोंगर उभा केला असून तो २२ कोटी ७५ लाख एवढा आहे. घरगुती, वाणिज्य किंवा औद्योगिक ग्राहकांपेक्षा सार्वजनिक पथदीपची थकबाकी सर्वांत जास्त आहे. १ हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९ कोटी ४६ लाख एवढी थकबाकी आहे.
महावितरण कंपनी कोरोना महामारीनंतर मोठ्या आर्थिक संकटात आली आहे. कंपनीला उभारी देण्यासाठी थकबाकी वसुली महत्वाची आहे; परंतु थकबाकीचा आकडा कमी होताना दिसत नाही. आर्थिक वर्ष संपायला १५ दिवस शिल्लक असताना महावितरणची थकबाकी २२ कोटीच्यावर गेली आहे. वसुलीसाठी महावितरण कंपनीने कठोर पावले उचलून अनेकांची वीज जोडणी तोडली आहे तर काहींनी कारवाईनंतर वीजबिल भरली आहेत. जिल्ह्यातील घरगुती ६३ हजार ९८१ ग्राहकांकडे ४ कोटी ९२ लाख थकबाकी आहे. वाणिज्य ७ हजार १२५ ग्राहकांकडे २ कोटी १४ लाख, औद्योगिक १७८ ग्राहकांकडे १ कोटी १३ लाख रुपये थकित आहेत. कृषीच्या ५ हजार ३३३ ग्राहकांकडे १ कोटी ४ लाख, सार्वजनिक पथदीपच्या १ हजार ५५७ स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९ कोटी ४६ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १ हजार १६४ ग्राहकांकडे २ कोटी १७ लाख, २ हजार १४ सार्वजनिक सेवांकडे १ कोटी २ लाख मिळून एकूण ८३ हजार ४७१ ग्राहकांकडे २२ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे. अन्य ग्राहकांच्या तुलनेत पथदीपची थकबाकी सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष समाप्तीमुळे पथदीपच्या बिलाचा भरणा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३१ मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.

------------------
चौकट

रत्नागिरी विभाग (१० कोटी ८२ लाख)
ग्राहक थकबाकी
घरगुती २७ हजार ९७७ - २ कोटी १० लाख
वाणिज्य ३ हजार १३६ - ९० लाख
औद्योगिक ४६१ - ३८ लाख
कृषी १ हजार ८४२ - ३५ लाख
पथदीप ८७६ - ५ कोटी ५ लाख
-------------------

चिपळूण विभाग (४ कोटी ५७ लाख)
ग्राहक थकबाकी
घरगुती १४ हजार ५४१ - १ कोटी २५ लाख
वाणिज्य १ हजार ८२९ - ५१ लाख
औद्योगिक ३७- २८ लाख
--------------------

खेड विभाग (७ कोटी ३५ लाख)

ग्राहक थकबाकी
घरगुती २१ हजार ४३६ - १ कोटी ५७ लाख
वाणिज्य २ हजार १६० - ७३ लाख
औद्योगिक २६० - ४६ लाख
कृषी १ हजार ९८१ - ३९ लाख

-------------------------
कोट...
महावितरणकडून थकबाकी वसुली सुरू करण्यात आली आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
- नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com