विकास महामंडळ योजनेंतर्गत 
नागरी बँकांचा समावेश करावा

विकास महामंडळ योजनेंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा

89249
प्रवीण काकडे

विकास महामंडळ योजनेंतर्गत
नागरी बँकांचा समावेश करावा

प्रवीण काकडे यांची सरकारकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने विविध कर्ज योजना व्याज परतावा योजना विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेची अट असून त्यामध्ये नागरी बँकांचाही समावेश करावा, अशी मागणी पत्रकाद्वारे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण काकडे यांनी राज्याकडे केली.
पत्रकात म्हटले आहे की, या महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक आहे व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच व्याज परतावा योजनेचा फायदा उद्योजक किंवा नागरिकांना होतो; परंतु राष्ट्रीयकृत बँकेकडून बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व सुशिक्षित बेरोजगार यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असून नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची व्याज परतावा योजना जशी राष्ट्रीयकृत बँकेसह इतर बँकांना सुद्धा लागू आहे, त्याच धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजना राष्ट्रीय कृत बँकांसोबत व इतर बँकांनाही लागू करावी, अशी मागणी काकडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com