
खरवतेतील मोनिका करणार भारताचे प्रतिनिधित्व
rat१५२८.TXT
(पान २ साठी, अॅंकर)
ओळी
- rat१५p२३.jpg ः
८९२५३
सावर्डे ः खरवते ग्रामीण भागातील मोनिका घाग यांचा सत्कार करताना आमदार निकम, प्रदीप चव्हाण, विजय भुवड.
खरवतेतील मोनिका करणार भारताचे प्रतिनिधित्व
मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा ः दुबई येथे जागतिक स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १५ ः चिपळूण तालुक्यातील खरवते फौजदारवाडी येथील मोनिका घाग यांनी भारताच्या पहिल्यावहिल्या मिक्स मार्शल आर्ट राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. मोनिका या दुबई येथे होणाऱ्या जागतिकस्तरावरिल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मोनिका मूळच्या रायगड जिल्ह्यातील जुई गावच्या आहेत. चिपळूण तालुक्यातील खरवते येथील किरण घाग कुस्तीपटू यांच्या त्या पत्नी आहेत. त्या महाविद्यालयीन काळात बॉक्सिंग खेळाकडे वळल्या तर २०१७ पासून त्या महिला कुस्ती स्पर्धेकडे वळल्या. रायगड जिल्ह्याला वैयक्तिक पातळीवर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवून दिला. राज्य पातळीवर बुश या खेळात २ सुवर्णपदक रायगड जिल्ह्याला मिळवून देणारी त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे दोनवेळा नेतृत्व केले आहे. संयुक्त अरब अमेरिठ के १ आशिया चॅम्पियनशिप या जागतिक स्पर्धेत त्या भारताचे नेतृव करणार आहेत. मोनिका घाग या ग्रामीण भागातील युवतीने मिक्स मार्शल आर्ट (MMA) या स्पर्धा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावून चिपळूण तालुक्याचेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले. या कामगिरीबद्दल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सावर्डे येथे सत्कार करण्यात आला.
थायलंडला तीन महिने सराव
दुबई येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या मोनिका यांना तीन महिन्याच्या सरावासाठी थायलंड येथे जावे लागणार आहे. या सरावाकरिता त्यांना पाच लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा विचार करता त्यांना मदत व्हावी व खेळामध्ये प्रोत्साहन मिळावे याकरिता आमदार निकम यांनी मदत केली तसेच जागतिक स्पर्धसाठी शुभेच्छाही दिल्या.