
जामसंडे-विष्णूनगरचा तरुण गळफास लावलेल्या स्थितीत
89352
श्रीपाद मोरे
जामसंडे-विष्णूनगरातील तरुणाची आमहत्या
देवगड ः जामसंडे-विष्णूनगर येथील तरुण घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी येथील ग्रामीण रुणालयात हलवले; मात्र त्याचा मृत्यू झाला. श्रीपाद राजेंद्र मोरे (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. १४) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसडे-विष्णूनगरमधील श्रीपाद मोरे या तरुणाने घरातील खोलीमध्ये गळफास लावल्याचे घरातील मंडळींच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी येथील ग्रामीण रुणालयात हलवले; मात्र त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह पोलिस नाईक प्रशांत जाधव, पोलिस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण आदींनी जाऊन पाहणी केली. याबाबत रेश्मा राजेंद्र मोरे (वय ४७) यांनी पोलिसांना माहिती दिली. येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.