शूटिंगमध्ये अनुराज, सान्वी, नीरज, गौरीला सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शूटिंगमध्ये अनुराज, सान्वी, नीरज, गौरीला सुवर्ण
शूटिंगमध्ये अनुराज, सान्वी, नीरज, गौरीला सुवर्ण

शूटिंगमध्ये अनुराज, सान्वी, नीरज, गौरीला सुवर्ण

sakal_logo
By

rat१३२५.TXT

बातमी क्र.. २५ (टुडे ३ साठी)

शूटिंगमध्ये अनुराज, सान्वी, नीरज, गौरीला सुवर्ण

खेड, ता. १५ ः एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित ‘डेरवण यूथ गेम्स २३’मधील रायफल शूटिंग स्पर्धा १४ वर्षांखालील मुले-मुली आणि १७ वर्षांखालील मुले-मुली या दोन गटांत आणि ओपन साइट रायफल, पीप साइट रायफल आणि एअर पिस्तुल या दोन गटात खेळवल्या गेल्या. ओपन साइट रायफलमध्ये १४ वर्षांखालील मुले गटात अनुराज सूर्यवंशी आणि मुलींच्या गटात सान्वी नाळे यांनी तर १७ वर्षांखालील मुलांमध्ये नीरज पाटील आणि मुलींच्या गटात गौरी मानेने सुवर्णपदक पटकावले. पीप साइट रायफल प्रकारात १४ वर्षांखालील मुलांमध्ये अर्जुन कदमने तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात रणवीर परदेशी, मुलींच्या गटात किरण राजमानेने अचूक लक्ष्यभेद करत सुवर्णपदक मिळवले.
एअर पिस्तुल (१४ वर्षांखालील मुले) यामध्ये यशराज गुजरे याने तर प्रसन्न भोसले हिने मुलींच्या गटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. (१७ वर्षांखालील मुले) गटात आयुष पाटणकर आणि मुलींच्या गटात गौरी चव्हाण हिने सुवर्णपदक मिळवले. आर्यमान शूटिंग या सोलापूर येथील संस्थेच्या खेळाडूंनी शूटिंगमध्ये एकूण आठ पदकांची कमाई केली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. संजीव कुट्टी, लंडनस्थित डॉ. नंदन कानविंदे आणि कानविंदे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. रौप्य आणि कांस्यपदके मिळवणाऱ्या खेळाडू ओपन साइट रायफल १४ वर्षांखालील मुले -साई खोत (रौप्य), श्लोक राऊत (कांस्य). मुली - युगरत्न शर्मा (रौप्य), हिरण्य सासणे (कांस्य). १७ वर्षांखालील मुले -प्रतीक राऊत (रौप्य), रूद्र काटकर (कांस्य). १७ वर्षांखालील मुली- नंदिनी सर्वगोड (रौप्य), प्रीशा महेश-गौरी (कांस्य). पीप साइट रायफल १४ वर्षांखालील मुले-कुशल सावंत (रौप्य), वरदराज पोवार (कांस्य). १७ वर्षांखालील मुले-व्यंकटेश पाटील (रौप्य), अथर्व शिंदे (कांस्य). मुली-सानिया शेख (रौप्य), वैष्णवी भंगाळे (कांस्य). एअर पिस्तुल १४ वर्षांखालील मुले-स्वामी समर्थ बगळे (रौप्य), प्रथमेश बनसोडे (कांस्य). मुली- आलिशा शरद (रौप्य), सिद्धी राजमाने (कांस्य). १७ वर्षांखालील मुले-आर्यमान खटावकर (रौप्य), तुषार वाघमारे (कांस्य). मुली-गौरी चव्हाण (रौप्य), साई देशमुख (कांस्य).