राजापूर ः मृत व्यक्ती ओळखविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः मृत व्यक्ती ओळखविना
राजापूर ः मृत व्यक्ती ओळखविना

राजापूर ः मृत व्यक्ती ओळखविना

sakal_logo
By

सोलयेत रेल्वेमार्गावर
अनोळखीचा मृतदेह
राजापूर, ता. १५ः सोलये (ता. राजापूर) जवळील रेल्वेमार्गावर २७ ऑगस्ट २०२२ दरम्यान मृतावस्थेत आढळलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाही. याबाबत राजापूर पोलिसांनी मृत व्यक्तीची माहिती फोटोसहित प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती सुमारे ३५ वर्षीय आहे. निमगोरा रंग व सडपातळ बांधा असून दाढी वाढलेल्या अवस्थेत होती. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर कन्नड भाषेत गोंदवलेले असून डाव्या हाताच्या मनगटावर फुलांची काढलेली नक्षी, आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स असे त्या मृत व्यक्तीचे वर्णन असून २७ ऑगस्ट २०२२ ला सोलये (ता. राजापूर) येथे सकाळी पेट्रोलिंग करत असलेल्या ट्रॅकमनला रेल्वेमार्गाच्या बाजूला ही व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर ट्रॅकमनने राजापूर रोड स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना माहिती कळवली. राजापूरचे स्टेशनमास्तर तेजस सुनील कदम यांनी राजापूर पोलिसांत खबर दिली होती. त्या घटनेनंतर त्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.