मंडणगडात कामबंद आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद

मंडणगडात कामबंद आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद

rat१४४.txt

बातमी क्र.. ४ (पान ५ साठी)

- Rat१४p२६.jpg ः
८८९५३
संपात सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी.

मंडणगडात कामबंद आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद

तहसीलदारांना दिले निवेदन ः कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कार्यरत

मंडणगड, ता. १५ ः सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सध्याची एनपीएस ही पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य प्रलंबित दहा मागण्यांसाठी १४ मार्चपासून पुकारलेल्या बेमुदत संपास मंडणगड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वगळता सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
मंडणगड तालुक्यातील एकूण ११ कर्मचारी संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भातील घोषणा केल्याशिवाय मागे न हटण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्याबांबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. यात पीएफ आरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी, अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त करा, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरू करा या दहा मागण्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com